एअर एशियाची जबरदस्त ऑफर, विमान प्रवास फक्त ८४९ रुपयांत
तुम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे? पण तिकीट दर जास्त असल्याने शक्य होत नाहीये. मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकणार आहात. एअर एशिया या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे
नवी दिल्ली : तुम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे? पण तिकीट दर जास्त असल्याने शक्य होत नाहीये. मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकणार आहात. एअर एशिया या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे
स्वस्त आणि मस्त प्रवासाची ऑफर
एअर एशियाच्या ऑफरनुसार नागरिकांना ८४९ रूपयांमध्ये देशांतर्गतव विमान प्रवास करता येणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी १,९९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
असा घेता येईल ऑफरचा लाभ
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला २६ मार्च ते १ एप्रिलच्या दरम्यान तिकीट बुकिंग करावं लागणार आहे. तसेच या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एअरलाईनच्या वेबसाईटवरुन किंवा मोबाईल अॅपवरुन तिकीट बुकिंग करावे लागणार आहे.
या योजनेचा लाभ १ ऑक्टोबर ते पुढील वर्षी २८ मे पर्यंतच्या विमान प्रवासासाठी घेता येणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.
या शहरांना मिळणार लाभ
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या योजने अंतर्गेत परदेशातील क्वालालंपुर, बँकॉक, मेलबर्न यासह अन्य काही ठिकाणी प्रवास करता येणार आहे. तर, देशांतर्गत विमान प्रवासासाठी बंगळुरु, रांची, जयपुर, भुवनेश्वर, विशाखापट्टनम, नागपूर, इंदूर, कोच्ची, हैदराबाद, पुणे, गुवाहाटी, चेन्नई आणि कोलकाता सारख्या शहरांत प्रवास करण्यासाठी होणार आहे.