जयपूर : भारतीय हवाई दलाला आणखी एक धक्का बसला आहे. जैसलमेरमध्ये लष्कराचे मिग-21 विमानाला अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गंगा गावाजवळील डीएनपी परिसरात हा अपघात झाला. नियमित प्रशिक्षणासाठी विमानाने उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातात पायलटचा मृत्यू


अपघातानंतर विमानाला आग लागली आणि त्यात वैमानिकाचा मृत्यू झालाय. शोध पथकाने पायलटचा मृतदेह बाहेर काढला पण आगीत तो जळून खाक झाल्याने त्याला वाचवता आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या जैसलमेरमध्ये हा अपघात झाला. 


प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात असले तरी या अपघाताची नियमित चौकशी नंतर केली जाईल. घटनास्थळी बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे.


कुन्नूर अपघातात सीडीएस यांनी गमावला जीव 


नुकतेच, कुन्नूर येथे देशातील पहिले सीडीएस जनरल बिपन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले, ज्यात रावत यांच्या पत्नीसह 14 जण ठार झाले. या अपघाताची हवाई दलाकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. परंतु हेलिकॉप्टरशिवाय मिग विमानांचे ही असे अपघात यापूर्वी घडले असून त्यांच्या सुरक्षेबाबत अनेकवेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.


यापूर्वी नोव्हेंबरमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये मिग-21 विमान कोसळले होते, परंतु पायलट सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला होता. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही अशीच एक घटना घडली होती. त्यात पायलटचा जीव वाचला होता.