राहत्या घरात गळफास, दोन पानी सुसाईट नोट; 6 महिन्यांनी आईनेही संपवलं जीवन; एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणी अखेर निर्णय
Air Hostess Geetika Sharma Suicide Case: गोपाल कांडाच्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस असणाऱ्या गीतिका शर्माने (Geetika Sharma) 5 ऑगस्ट 2012 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गीतिकाने सुसाईड नोटमध्ये कांडा आणि त्यांची MDLR कंपनीतील सीनिअर मॅनेजर अरुण चढ्ढा यांना जबाबदार धरलं होतं.
Air Hostess Geetika Sharma Suicide Case: दिल्लीमधील बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी (Geetika Sharma Suicide Case) कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या हरियाणाच्या माजी गृहराज्यमंत्री गोपाल कांडा (Gopal Kanda) यांची सुटका केली आहे. दिल्ली कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांची माजी सहकारी अरुणा चढ्ढा यांचीही सुटका केली आहे. कोर्टाने यावेळी गोपाल कांडा यांना 1 लाखांचा पर्सनल बाँड भरण्यास सांगितला असून, पोलिसांनी सुटकेविरोधात याचिका दाखल केल्यास हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
गीतिका शर्मा गोपाल कांडा यांच्या एमडीएलआर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. 5 ऑगस्ट 2012 रोजी गीतिकाने अशोक विहार येथील घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. यावेळी तिने सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोटमध्ये तिने गोपाल कांडा आणि त्यांच्या MDLR कंपनीतील सीनियर मॅनेजर अरुण चढ्ढा यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं.
गीतिकाने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
गीतिकाने दोन पानांची सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये तिने गोपाल कांडा आणि अरुणा चढ्ढा यांना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं. "आज मी स्वत:ला संपवत आहे, कारण मी आतून पूर्पपणे तुटली आहे. माझ्या विश्वासाला तडा गेला असून, माझी फसवणूक झाली आहे. माझ्या मृत्यूसाठी गोपाल कांडा आणि अरुण चढ्ढा जबाबदार आहेत. दोघांनी माझ्या विश्वासाला तडा दिला असून, आपल्या फायद्यासाठी माझा वापर केला. या लोकांनी माझ्या आयुष्याची वाट लावली असून, आता माझ्या कुटुंबाचंही नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळायला हवी," असं तिने पत्रात लिहिलं होतं.
18 महिन्यांचा कारावास
याप्रकरणी गोपाल कांडा 18 महिन्यात जेलमध्ये होते. मार्च 2004 मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. गीतिकाच्या आत्महत्येनंतर सहा महिन्यांनी तिच्या आईनेही आत्महत्या केली होती. त्यांनीही आपल्या मृत्यूसाठी गोपाल कांडा यांना जबाबदार धरलं होतं.
गोपाल कांडा अद्यापही हरियाणा लोकहित पार्टीमधून सरसाचे आमदार आहेत. हे प्रकरण घडलं तेव्हा गोपाल कांडा यांना हरियाणाचे एक मोठे नेते आणि व्यापारी म्हणून ओळखलं जात होतं. त्यावळी भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये ते राज्याचे गृहमंत्री होते. त्याच्याकडे शहर विकास, उद्योग आणि वाणिज्य खातीही होती.
काय आरोप होते?
गोपाल कांडा अद्यापही हरियाणा लोकहित पार्टीमधून सरसाचे आमदार आहेत. हे प्रकरण घडलं तेव्हा गोपाल कांडा यांना हरियाणाचे एक मोठे नेते आणि व्यापारी म्हणून ओळखलं जात होतं. त्यावळी भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये ते राज्याचे गृहमंत्री होते. त्याच्याकडे शहर विकास, उद्योग आणि वाणिज्य खातीही होती.
गोपाल दांडा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 201 (पुरावा नष्ट करणे), 120B (गुन्हेगारी कट) आणि 466 (बनावट) यासह विविध कलमांखाली आरोप होते. एका ट्रायल कोर्टाने त्यांच्यावर बलात्कार (376) आणि 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) चे आरोप देखील निश्चित केले होते. परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने ते रद्द केले.