मुंबई : काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या खाद्यपदार्थांमध्ये झुरळ आढळल्याचे वृत्त आले होते.  त्यापाठोपाठ आता एअर इंडियाच्या सेवेवरही प्रश्नचिन्ह उठवण्यात आले आहेत.   कारण त्यांच्या जेवणाच्या प्लेटवर झुरळ फिरत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


काय आहे प्रकरण ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरिंदर बवेजा या प्रवाशाने ट्विटरवर एअर इंडियाच्या जेवणाच्या थाळीमध्ये झुरळ फिरत असल्याचे फोटो अपलोड केला आहे. सोबतच एअर इंडियाला टॅग करून संबंधित तक्रार केली आहे. हा प्रकार दिल्लीतील विमानतळावर फर्स्ट क्लास आणि बिजनेस श्रेणीच्या लॉन्जमध्ये झाला आहे.   



 


हरिंदर यांनी हे ट्विट २० डिसएंबर रोजी सकाळी ११ वाजता केलं होतं.  


ट्विटरकरांनी उडवली खिल्ली 


ट्विटरकरांनी एअर इंडियाची खिल्ली उडवत त्यांच्या सेवेकर टीका केली आहे. काहींनी व्हेजच्या दरात नॉनव्हेज पदार्थ उपलब्ध असे म्हणत एअर इंडियाची खिल्ली उडवली आहे.  


एअर इंडियाची माफी 


या प्रकारानंतर एअर इंडियाने प्रवाशाची माफी मागितली आहे.