Air India : वाद करा पण इथं कुठं! विमानाने टेक ऑफ केलं तिथेच लॅण्डींग करण्याची वेळ; कारण वाचून थक्क व्हाल
Air India : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवास आणि त्याबाबतच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरल्याचं पाहायला मिळालं आहे. एखादा प्रवासी येतो काय, गोंधळ घालतो काय ... एअर इंडियाच्या विमानात घडलेला प्रकार चर्चेत.
Air India : विमान प्रवासादरम्यान घडणारे अनेक किस्से, प्रसंग आणि घटना बऱ्याचदा आठवणीत राहतात. पण, सगळ्याच आठवणी चांगल्या असतात असं नाही. अशाच काही मनस्ताप देणाऱ्या प्रसंगाला सामोरं जात या अप्रिय आठवणी एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणाऱ्या विमानातील प्रवाशांना मिळाल्या. तिथे विमानप्रवासादरम्यान प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या घटना कमी होत असतानाच आता तत्सम एका प्रकरणानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. (Air India Delhi London flight deboards after boarding latest marathi news )
नुकतंच दिल्लीवरून लंडनच्या दिशेनं झेपावणाऱ्या विमानात एक अनपेक्षित घटना घडली. Air India च्या एआय 111 मध्ये असणाऱ्या एका प्रवाशानं धुडगूस घातल्यामुळं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Indira Gandhi International Airport) लंडनच्या रोखानं निघालेल्या विमानाला टेक ऑफनंतर पुन्हा लँड करण्यात आलं. ज्यानंतर गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशाला विमानातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
विमानात असं नेमकं घडलं तरी काय?
उपलब्ध माहितीनुसार दिल्लीवरून लंडनच्या दिशेनं निघालेल्या या विमानानं टेकऑफ करताच एक प्रवासी विमानात क्रू मेंबरर्सशी वाद घालू लागला. प्रवाशाचा धुडगूस इतका विकोपास गेला की शेवटी विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर लँकड करण्यात आलं.
हेसुद्धा वाचा : Sangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar
तब्बल 225 प्रवासी असणाऱ्या या विमानात एका प्रवाशामुळं सर्वांनाच मनस्ताप झाला होता. विमानाचं टेक ऑफ, त्यानंतर ते पुन्हा दिल्लीत लँड करणं, प्रवाशाला विमानातून उतरवणं आणि पुन्हा हीथ्रो विमानतळाच्या दिशेनं झेपावणं या साऱ्यामध्ये बराच वेळही दवडला गेला. दरम्यान, सदर प्रकरणी दिल्ली विमानतळ पोलीसांकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून, त्या प्रवाशाला पोलीस स्थानकातच ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
काय चाललंय काय? प्रवाशांचा मनस्ताप कमी होईना
एअर इंडियाचं आणखी एक विमानही सोमवारी एकाएकी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, इथं कारण कुणी प्रवासी किंवा त्यानं घातलेला धुडगूस नसून तांत्रिक कारण होतं. सूत्रांच्या माहितीनुसार उड्डाण भरण्यापूर्वीच विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याची बाब निदर्शनास आली. ज्यामुळं विमान जागच्या जागीच उभं ठेवण्यात आलं.
बिघाडाची बाब लक्षात येताच या विमानातील प्रवाशांना तातडीनं दिसऱ्या विमानात जागा देण्यात आली आणि त्यानंतर या विमानानं सॅन फ्रान्सिस्कोच्या दिशेनं उड्डाण भरलं. या विमानात साधारण 200 प्रवासी होते. दरम्यान, या प्ररकरणी एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.