Diwali Bonus : कर्मचारी मालामाल; भर दिवाळीत पगार भत्त्यात वाढ, पाहा कोणाला लागली लॉटरी
Diwali Bonus : दिवाळी म्हटली की, अनेकांनाच उत्सुकता असते ती म्हणजे अनोख्या उत्साहाची आणि सोबतच खात्यात जमा होणाऱ्या दिवाळी बोनसची.
Diwali Bonus : दिवाळी बोनस... नाव उच्चारताच कुतूहल परिसीमा गाठतं. निमित्त असतं ते म्हणजे या बोनसच्या नावाखाली हाती येणारी रक्कम. विविध सरकारी आणि निम सरकारी अर्थात खासगी संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीमध्ये मूळ पगाराची वाढीव रक्कम खात्यात जमा करतात. पगार आणि त्याशिवाय खात्यात जमा झालेली ही जास्तीची रक्कम म्हणजे अनेकांसाठीच सुख. कैक गरजा असो, त्या गरजा पूर्ण करण्यासाठीसुद्धा याच रकमेची मदत होते.
मागील काही वर्षांमध्ये जागतिक आर्थिक मंदीमुळं एकिकडे अनेक संस्थांच्या आर्थिक गणितांमध्ये गडबड होत असली तरीही यंदाच्या वर्षी मात्र दिवाळी बोनस देत कर्मचाऱ्यांना कैक संस्थानी मोठा दिलासा दिला आहे. एअर इंडियासुद्धा (Air India) यात मागे राहिली नाही. विस्तारासोबत एअर इंडियाचं विलिनीकरण होत असून, याच धर्तीवर कंपनीकडून काही धोरणांमध्ये बदल करण्यात आला आहे.
कंपनीच्या याच धोरणांनुसार केबिन कर्मचारी आणि वैमानिकांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळं त्यांच्यासाठी हा बोनसच, असं म्हणणं गैर नाही. बदललेल्या धोरणांनुसार एअर इंडियाकडून केबिन कर्मचाऱ्यांना हॉटल रुम शेअर करायला लावली होती. प्रवासानंतर खासगी वेळेची गरज असल्याचं म्हणत कर्मचाऱ्यांनी मात्र या धोरणाचा विरोध केला होता.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूल
कर्मचाऱ्यांचा एकंदर विरोध पाहता अखेर एअर इंडियानं काही बदल केले. ज्यानुसार फक्त कमी अंतराच्याच प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांना रुम शेअर करावी लागणार आहे. प्रवास मोठा असल्यास मात्र कर्मचाऱ्यांना वैयक्तिक खोली दिली जाणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांना 85 ते 135 अमेरिकी डॉलर इतका वाढीव भत्ता दिला जाणार आहे, ज्यामुळं कर्मचाऱ्यांना फायदाच फायदा होणार आहे.
ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्यामुळं फक्त दिवाळीच नव्हे, त्यानंतरही कर्मचाऱ्यांना या धोरणाचा फायदा होणार आहे. त्यामुळं ही दिवाळी खऱ्या अर्थानं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना फळली असं म्हणावं लागेल.