Air India Express Crisis: वेळ वाचून प्रवास सुकर व्हावा यासाठी अनेकदा बरीच मंडळी विमानप्रवासाला महत्त्वं देताना दिसत आहेत. अशा सर्व मंडळींना आणि त्यातूनही एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाची तिकीटं बुक केलेल्यांना सध्या प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. कारण, एअर इंडिया एक्स्प्रेसची अनेक उड्डाणं आयत्या वेळी रद्द केल्यामुळं हे संकट ओढावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर इंडियामधील अनेक वरिष्ठ क्रू मेंबर्सनं मोठ्या संख्येनं seak leave अर्थात आजारपणाची रजा घेतल्यामुळं ही अडचण निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत हा सर्व प्रकार घडल्यामुळं अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार सिविल एविएशन अथॉरिटीच्या वतीनं सदर प्रकरणाचा तपास सुरु असून, त्यानंतर पुढील माहिती जारी केली जाणार आहे. 


क्रू मेंबर्स Seak Leave वर? 


एयर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही क्रू मेंबर्सनी मंगळवारी रात्रीपासूनच अचानक Seak Leave घेतल्यामुळं काही विमानांच्या उड्डाणांमध्ये दिरंगाई झाली, तर काही उड्डाणं पूर्णपणे रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान, प्रवाशांना त्यांच्या प्रवासात फार अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी एअर इंडिया प्रयत्नशील असून, प्रवाशांच्या गैरसोयीसाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. 


हेसुद्धा वाचा : Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देण्यावरून राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला... 


प्रवाशांच्या तिकीटांची रक्कम बुडाली? 


एअर इंडियाची जवळपास 70 उड्डाणं रद्द करण्यात आल्यामुळं तिकीटाचे पैसे बुडाले का? असाच प्रश्न अनेक प्रवाशांना पडला. पण, कंपनीच्या वतीनं त्याबाबतची स्पष्टोक्ती देत प्रवाशांना दिलासा देण्यात आला. जी उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत त्यातील प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पूर्ण पैसे परत करण्यात येणार असून, गरजेनुसार जी उड्डाणं रद्द झालेली नाहीत त्या प्रवाशांसाठी नि:शुल्क दुसऱ्या उड्डाणाची सोय करून दिली जाणार आहे.