कुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून महिला केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ
Air India Passenger Abuses Cabin Crew : विमान प्रवासादरम्यान काही गोष्टी, काही नियमांचं पालन प्रवाशांनी करणं अपेक्षित असतं. पण, बऱ्याचदा काही उद्दाम प्रवासी यंत्रणांच्या नाकी नऊ आणताना दिसतात.
Air India Passenger Abuses Cabin Crew : विमानातून केला जाणारा प्रवास हा कायमच खास असतो. पण, या प्रवासादरम्यान सर्वांनाच चांगले अनुभव येतील असंही नाही. कारण अनेकदा काही असे अनुचित प्रकार या प्रवासादरम्यान घडतात जे पाहून आपण चुकीच्या जागी तर आलो नाही, असं उगाचच वाटत राहतं. नुकताच (Air India) एअर इंडियाच्या एका विमानात असाच अनुभव आला.
विमानात घडला चुकीचा प्रकार...
दिल्ली पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते दिल्ली दरम्यानच्या flight AI 102 मध्ये एका प्रवाशानं विमानातील महिला क्रू मेंबरला शिवीगाळ करत गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याचं म्हटलं गेलं. 1 ऑक्टोबरला पीडितेनं आयजीआय पोलिसांत सदर प्रकरणाची तक्रार दाखल केली.
घडला प्रकार माहितीये?
ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पंजाबच्या जलंधर येथील अभिनव शर्मा नावाच्या एका प्रवाशाविरोधात हा गंभीर गुन्हा दाखल झाला. ज्यानं विमानातील महिला कर्मचाऱ्याविरोधात अभद्र शब्दांमध्ये बरळण्यास सुरुवात केली आणि विमानातील इतर प्रवाशांना त्रास होईल अशी गोंधळाची परिस्थीत निर्माण केली.
ही महिला कर्मचारी इकोनॉमी क्लासमध्ये काम करत असतानाच एका प्रवाशानं तिच्याबाबत अश्लील आणि अभद्र टीप्पणी करण्यास सुरुवात केली. त्यानं विमानातील इतर प्रवाशांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे, तर काही वेळानंतर या इसमानं विमानात इत्रतत्र जात विमानातील सहप्रवाशांनाही शिवीगाळ करम्यास सुरुवात केली. ज्यानंतर विमानातील केबिन क्रू सुपरवायजरनं त्याला तोंडी आणि नंतर प्रकरण वाढताच लेखी ताकिद दिली.
हेसुद्धा वाचा : परतीच्या पावसामुळं देशातील 'या' राज्यांना बसणार फटका; तर 'इथं' होणार हिमवृष्टी
प्रवाशाचा उद्दामपणा इतका वाढला की त्यानं अचानकच वर्णभेदी वक्तव्य करत देशाचाही अपमान करण्यास सुरुवात केली आणि अखेर केबिन क्रूनं त्याच्यावर आवर घालण्याचा पवित्रा घेतला. हा सर्व झाला प्रकार पाहता केबिन क्रूच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी प्रवाशाविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत कलम 509 आणि कलम 22/23 मधील एअरक्राफ्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
विमानातील उद्दामपणा चांगलाच शेकेल... पाहा नियम काय सांगतो..
Directorate General of Civil Aviation (DGCA) च्या वतीनं नियमांचं उल्लंघन करून वागणाऱ्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी बंदीचीही कारवाई केली जाते. ज्यामुळं त्यांना ठराविक कालावधीसाठी किंवा आजन्म विमान प्रवास निषिद्ध ठरवला जातो.
DGCA नुसार यासाठी तीन स्तर ठरवण्यात आले आहेत.
Level 1 - शारीरिक हालचाली, हावभाव, शिवीगाळ
Level 2 - शारीरिक अश्लील कृत्य, एखाद्याला धक्का देणे, लैंगिक शोषण
Level 3 - विमानाचं नुकसान करणं, जीवघेणी कृत्य करणं, हाणामारी, किंवा तत्सम कृत्य करणं.
वरील कृत्य आणि त्यांच्या स्तरानुसार त्या त्या विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थांकडून अंतर्गत समिती या प्रवाशांसाठी बंदीचा कालावधी निर्धारित करतात.