Air India जागतिक विक्रमाच्या उंबरठ्यावर...500 विमानांची खरेदी करणार?
Air India: एअर इंडिया या विमानसेवा कंपनीला टाटा (Tata Takeover to Air India) यांनी विकत घेतल्यानंतर आता एअर इंडिया (Air India) कात टाकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडिया कंपनीची (Air India News) आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती.
Air India News: एअर इंडिया या विमानसेवा कंपनीला टाटा (Tata Takeover to Air India) यांनी विकत घेतल्यानंतर आता एअर इंडिया (Air India) कात टाकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एअर इंडिया कंपनीची (Air India News) आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. त्यातून या कंपनीला टाटा यांनी टेकऑव्हर केल्यानंतर आता काही चांगले बदल या कंपनीतून उमटतील अशी आशा आहे. त्यातच आता या नव्या बातमीनं काही नवे बदल होण्याची अपेक्षा आहे. आता या नव्या बदलात काय काय गोष्टी अपेक्षित आहेत याची उत्सुकता आहे. यावेळी या नव्या बदलानं इंडियन एव्हियेशनच्या (Indian Aviation) इतिहासात विक्रम रचला जाऊ शकतो, असे एव्हियेशन तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या गोष्टी कोणत्या आहेत? सध्या यामुळे या व्यवसायालाही चालना मिळू शकते. (air india plans to buy 500 aircrafts see whats tatas next plan know more)
समोर आलेल्या माहितीनुसार, कोविडनंतर आता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विमानप्रवास वाढू लागला आहे. त्यातून आता एयर इंडियातर्फेही अनेक विमानं आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाच्या फेऱ्या वाढवत आहे. याच पार्श्वभुमीवर एयर इंडिया ही कंपनी 500 विमानं विकत घेणार असण्याची शक्यता वर्तवली आहे, असे झाल्यास हा एक नवा विक्रम ठरेल असे बोलले जाते आहे. त्यामुळे हा बदल भारतीय एव्हियेशनच्या (Air India Buys 500 Aircrafts) दृष्टीनं सकारात्मक असेल. काही तज्ञांच्या मते, असे झाल्यास ही एक वेगळा विक्रम ठरलेच परंतु त्यातूनही एका विमान कंपनीनेच हे 500 विमानं विकत घेण्याइतपतच मर्यादित नसेल तर, त्यानं पुर्ण विमानसेवेत बदल होतील.
यामुळे आतंरराष्ट्रीय विमानसेवेतही एअर इंडिया विमान कंपनीचे (Air India Direct Service) नावं मोठे होईल. त्यातून भारताची थेट सेवा कुठल्या देशातही नाही. त्यामुळे यातून काहीतरी वेगळे बदल होतील, असे तज्ञांचे म्हणणे आहे. समोर आलेल्या या माहितीनुसार, याबद्दल एयर इंडियानं मात्र अद्याप कुठलाही खुलासा केला नाही असे कळते. परंतु लवकरच एयर इंडिया नव्या 500 विमानांची खरेदी करणार असल्याचे समजते आहे.
हेही वाचा - Prince Harry: वयाच्या 17 व्या वर्षी कौमार्य गमावणं... प्रिन्स हॅरीसोबत 'त्या' रात्री काय घडलं?
एअरबस A350 चे आणि बोईंग 787s आणि 777s ची विमानं यात असतील अशी माहिती कळते. त्यात 100 ही मोठ्या आकाराची तर 400 ही छोट्या आकारांची असतील. एकूण 500 विमानं खरेदी होणार असल्यानं त्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. 400 विमानांमध्ये A-320, A-321 यांचाही समावेश असून उरलेल्या 100 विमानांमध्ये 787S, 777X आणि 777 फ्रीटर्स यांचाही समावेश असेल. अशा प्रकारची ही विमानं असतील अशी माहिती कळते आहे.