Prince Harry: वयाच्या 17 व्या वर्षी कौमार्य गमावणं... प्रिन्स हॅरीसोबत 'त्या' रात्री काय घडलं?

Prince Harry Spare Book: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे स्पेयअर या प्रिन्स हॅरी यांच्या ऑटोबायोग्राफीची. सध्या या पुस्तकातून अनेक वादग्रस्त खुलासे झाले आहेत आणि इंग्लंडच्या रात्रपुत्राचे अनेक रहस्ये समोर आली आहेत. 

Updated: Jan 18, 2023, 12:14 PM IST
Prince Harry: वयाच्या 17 व्या वर्षी कौमार्य गमावणं... प्रिन्स हॅरीसोबत 'त्या' रात्री काय घडलं?  title=

Prince Harry Spare Book: गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे इंग्लंडचा रात्रपुत्र प्रिन्स हॅरी (Prince Harry Spare) याची. हॅरी यांची ऑटोबायोग्राफी स्पेयअर ही नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या ऑटोबायोग्राफीतून अनेक धक्कादायक खुलासे प्रिन्स हॅरी (Autobiography) यांनी स्वत:हून सांगितले आहे. यामध्ये टीनएजमध्येच कौमार्य गमावणं (Virginity), ड्रग्जच्या (Drugs) आहारी जाणं आणि कौटुंबिक वाद यांच्याबद्दल अनेक खुलासे त्यांनी केले आहे. आपल्या अनेक मुलाखतीतून आणि डॉक्यूमेंट्ररीजमधूनही प्रिन्स हॅरी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. तेव्हा आता सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे स्पेयअर या त्यांच्या ऑटोबायोग्राफीची. लहानपणापासूनच आई प्रिन्सेस डायना यांच्यासोबत पुर्णत: घालवलेला वेळ, त्यानंतर आई-वडिल प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या घटस्फोटाचं वादळं, त्यानंतर त्यांचे वेगळे होणे, आई प्रिन्सेस डायनाचा मृत्यू, प्रिन्स चार्ल्स यांचे दुसरे लग्न ते मेगन मार्कलशी लग्न या घडामोडींमध्ये प्रिन्स हॅरी यांच्या आयुष्यात काय काय घडले यांचे दर्शन प्रेक्षकांना या स्पेयअर (Spare) पुस्तकातून घडले आहे. 

प्रिन्स चार्ल्स यांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध? 

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रिन्सेस डायना यांच्या मृत्यूनंतर कॅमेला (Prince Charles Second Marriage) यांच्याशी प्रिन्स चार्ल्स यांनी 2005 साली लग्न केले परंतु या लग्नाला खुद्द प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांचा विरोध होता. असेही म्हटले जाते की, प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांचे कॅमेला यांच्याशी फारसे जवळचे संबंध नसून ते त्यांच्याशी फार जवळीकही साधून नाही. ते एकमेकांशी फार कमी बोलतात परंतु त्यांचे संबंध चांगले आहेत. 

प्रिन्सेस डायना यांच्या मृत्यूनंतर नैराश्याला सामोरे?

आपल्या आईच्या (Princess Diana Death) अपघाती मृत्यूनंतर, प्रिन्स हॅरी यांना नैराश्यालाही सामोरे जावे लागले होते असेही प्रिन्स हॅरी यांच्यावर लिहून आलेल्या अनेक लेखांतून आणि लघूपटांतून समोर येते आहे. त्याचबरोबर अनेकदा स्वत: प्रिन्स हॅरी यांनीही यावरती खुलासा केला आहे. 

भाऊ प्रिन्स विल्यम यांच्याशी वाद 

गेल्या काही दिवसांपासून प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम (Prince William and  Prince Harry Confilct) यांच्या भांडणांविषयी अनेकदा बोललं जातं आहे. रॉयल फॅमिलीमध्ये वर्णभेद आहे आणि याचा त्रास आपल्या पत्नीला मेगन मार्कलला झाला असल्याचेही प्रिन्स हॅरी उघडपणे बोलताना दिसले आहे. त्याचदरम्यान आपल्या पत्नीला घेऊन प्रिन्स विल्यम यांनी चुकीचे शब्द काढल्यानं प्रिन्स विल्यम यांच्यासोबत त्यांची बाताबाती झाली आणि त्यात प्रिन्स विल्यम यांनी त्यांना जोरात धक्का मारला आणि खाली पाडले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. 

सेक्स, ड्र्ग्ज आणि..

या पुस्तकातून आलेल्या माहितीनुसार, वयाच्या 17 व्या वर्षी प्रिन्स हॅरी यांनी आपलं कौमार्य गमावले होते. ही घटना 2001 ची आहे जेव्हा एका पबिंगनंतर (Sex) त्यांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलेसोबत सेक्स केला होता. प्रिन्स हॅरी ड्रग्जच्या आहारीही गेले होते याबद्दलही त्यांनी स्वत:हून खुलासा केला आहे.