विमानाने प्रवास करताय? मग `या` प्रवाशांच्या खिशावर पडणार ताण ... जाणून घ्या कारण
Air India Policy: टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिली जाणारी मूळ भाडे सवलत निम्म्यावर आणली आहे.
Air India Customer Care: टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाने (Air India) ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिली जाणारी मूळ भाडे सवलत निम्म्यावर आणली आहे. एअरलाइन्सकडून (Airlines) सांगण्यात आले की त्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मूलभूत भाड्यात दिलेली सवलत 50 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. (air india reduces senior citizen student concessions)
आता 25% सूट मिळणार
कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बेस फेअरमध्ये सुधारित सवलत 29 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. आतापर्यंत एअर इंडिया या दोन्ही श्रेणींमध्ये 50 टक्के सूट देत होती. एअर इंडियाच्या (Air India) वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 'ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना 29 सप्टेंबर किंवा त्यानंतर जारी केलेल्या तिकिटांच्या मूळ भाड्यावर 25 टक्के सवलत मिळेल. ही सवलत इकॉनॉमी केबिनमधील (Economy cabin) निवडक बुकिंग श्रेणीवर उपलब्ध असेल.
वाचा : ललिता पंचमीचे व्रत केल्यास मिळते आरोग्याचे वरदान, साजरा कसा करायचा ते जाणून घ्या!
इतर श्रेणीतील सूट कायम राहील
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सवलतींमध्ये बदल केले आहेत. ते म्हणाले की इतर खाजगी विमान कंपन्यांच्या तुलनेत मूळ भाड्यावर सवलत जवळजवळ दुप्पट आहे. याशिवाय इतर श्रेणींमध्येही शिथिलता कायम राहणार आहे.