COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक कंपन्या, कारखाने, फॅक्टरी बंद आहेत. संपूर्ण ऑफिसेस बंद करण्यात आल्याने रस्त्यांवरील वाहतून जवळपास बंद आहे. याचा मोठा परिणाम हवामानार झाल्याचं पाहायला मिळतंय. हवामान गुणवत्ता आणि हवामान अंदाज, संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार Centre-run System of Air Quality and Weather Forecasting and Research (SAFAR), लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी चांगली कमी झाली आहे. दिल्लीत प्रदूषणाची पातळी 30 टक्क्यांनी तर पुणे आणि अहमदाबादमुळे 15 टक्क्यांनी कमी झाली आहे.


श्वसनासाठी धोका वाढवू शकणाऱ्या, नायट्रोजन ऑक्साईडच्या (एनओएक्स) प्रदूषणाची पातळीदेखील कमी झाली आहे. नायट्रोजन ऑक्साईडचं प्रदूषण मुख्यतः मोटार वाहनांच्या वाहतुकीमुळे होतं. पुण्यात नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण 45 टक्क्यांनी कमी झालं आहे. तर मुंबईत 38 टक्क्यांनी आणि अहमदाबादमध्ये 50 टक्क्यांनी कमी झालं आहे. 


लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करतायेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्च्या मालाच्या होणाऱ्या पुरवठ्यासाठीची वाहतूकही बंद आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाली आहे. कधीही न थांबणारी मुंबई, पुणे, अहमदाबादसारखी अनेक मोठी व्यापारी शहरं कोरोनामुळे ठप्प झाल्याने याचा परिणाम हवेतील प्रदूषणावर होतोय. 


गेल्या कित्येक वर्षात मोकळा श्वास न घेतलेली मुंबई, अहमदाबाद, पुणे यांसाखी अनेक मोठी शहरं लॉकडाऊनच्या निमित्ताने मोकळा शांत झालेली, मोकळा श्वास घेतना दिसतायेत. 


मार्च २०१९ मध्ये मुंबईतील हवा एक्यूआय १५३ होती. मात्र आता, 2020 मार्च महिन्यात मुंबईतील वायुची शुद्धता एक्यूआय ६६ इतकी नोंदवण्यात आली आहे.


दिल्ली प्रदूषणाची स्थिती अतिशय वाईट होती. प्रदूषणाचा स्थर इतका खालावला होता की, लोकांना रस्त्यांवरुन चालताना मास्क लावून चालावं लागत होतं. पण लॉकडाऊननंतर आता दिल्लीत अनेक वर्षांनंतर हवामानाची स्थिती चांगली, वायूप्रदूषण कमी झाल्याची नोंद करण्यात आली. जगात प्रदूषणामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र आता लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.