विमान उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना पैसे परत
नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली
नवी दिल्ली: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. विमान कंपनीकडून उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना २४ तासाच्या आत पैसे परत मिळणार आहेत. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नवीन प्रस्ताव तयार केला आहे. तसंच प्रवासाचं तिकीट बुकींगनंतर २४ तासाच्या आत रद्द केलं किंवा बुकींगमध्ये बदल केलात तर त्यासाठी कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही. कंपनीच्या चुकीमुळे उड्डाण रद्द झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देण्याचाही मुद्दाही प्रस्तावात आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली. या नवीन प्रस्तावावर सर्व पक्षांची मतं मागितली आहेत. दोन महिन्यात हा प्रस्ताव लागू करण्याचा विचार आहे.