रेल्वेचं तिकीट कन्फर्म न झाल्यास विमानाने प्रवासाची संधी
जर तुम्ही राजधानी एक्सप्रेसमधील एसी फर्स्ट किंवा एसी सेकंड क्लासचं तिकीट काढत असाल आणि ते तिकीट कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पण ट्रेन तिकीट आणि एअर तिकीटमधील भाड्याचं जे अंतर असेल त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असतांना मागील वर्षी हा प्रस्ताव रेल्वेला दिला होता. पण त्यावेळी रेल्वेने याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ते स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की, एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याला ते मंजुरी देतील.
मुंबई : जर तुम्ही राजधानी एक्सप्रेसमधील एसी फर्स्ट किंवा एसी सेकंड क्लासचं तिकीट काढत असाल आणि ते तिकीट कन्फर्म नाही झालं तर तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकते. पण ट्रेन तिकीट आणि एअर तिकीटमधील भाड्याचं जे अंतर असेल त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाचे चेअरमन असतांना मागील वर्षी हा प्रस्ताव रेल्वेला दिला होता. पण त्यावेळी रेल्वेने याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नव्हती. आता ते स्वत: रेल्वे बोर्डाचे चेअरमन आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की, एअर इंडियाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याला ते मंजुरी देतील.
रेल्वेमध्ये डिमांड आणि सप्लायमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर असल्याने प्रवाशांना राजधानी एक्सप्रेसचं कन्फर्म तिकीट नाही मिळत. अशातच एअर इंडियाचे माजी चेअरमन लोहानी यांची योजना होती की, अशा लोकांची माहिती एअर इंडियाला रेल्वेने पुरवावी. अशा प्रवाशांना फ्लाइटमध्ये सीट ऑफर केली जाणार आहे. यासाठी जास्त पैसे देखील खर्च नाही करावे लागणार. लोहानी यांनी म्हटलं की, 'राजधानी एसी सेकेंड क्लासचं भाडं आणि विमानाचं भाडं यामध्ये जास्त अंतर नाही आहे. दुसरीकडे सरकार एअर इंडियाला प्रायवेट हातामध्ये सोपवण्याची तयारी करत आहे. असं म्हटलं जातंय की ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. अशातच हे पाहावं लागेल की एअर इंडिया रेल्वेला असा प्रस्ताव पुन्हा देते की नाही.