अवघ्या ९९९ रूपयांत करा हवाई प्रवास, एअर एशियाची खास ऑफर
आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकता. एअर एशियाने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. एअर एशियाने जाहीर केलेल्या ऑफरनुसार नागरिकांना ९९९ रूपयांमध्ये विमानप्रवास करता येणार आहे.
नवी दिल्ली : आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकता. एअर एशियाने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. एअर एशियाने जाहीर केलेल्या ऑफरनुसार नागरिकांना ९९९ रूपयांमध्ये विमानप्रवास करता येणार आहे.
जे प्रवासी या ऑफरचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती अशी की, हा तिकीट दर केवळ एकेरी प्रवासासाठी असणार आहे. म्हणजेच ही ऑफर घेऊन तुम्ही प्रवासाला सुरूवात केली तर, प्रवासावरून परतत असताना तुम्हाला नव्याने तिकीट काढावे लागेल. किंवा आगोदरच तसे वेगळे तिकीट बूक करावे लागेल. '७ डेज ऑफ मेड डील्स' असे या ऑफरचे नाव ठेवण्यात आले आहे. या ऑफर अंतर्गत बुक केलेले तिकीट हे २६ फेब्रुवारी २०१८ ते २८ ऑगस्ट २०१८ या कालावधीतील प्रवासासाठी वैध राहणार आहे. ऑफरमध्ये तिकीट बुक करण्यासाठी सेल सुरू झाला असून, तिकीट बुकींगची मुदत २७ ऑगस्टपर्यंत राहणार आहे.
एअर एशियाच्या वेबसाईट तसेच, मोबाईल अॅप्लिकेशनवरूनही तुम्ही हे तिकीट बुक करू शकता. या ऑफरमध्ये एकुण किती सीट्स बुक केल्या जाणार आहेत याबाबत एअर एशियाने माहिती दिली नाही. मात्र, एअर एशियाचे म्हणने असे की, ऑफरमध्ये मिळणारे तिकीट हे मर्यादित सीट्ससाठीच असणार आहे. तसेच, एअर एशियाच्या सर्वच्या सर्वच विमानांमध्ये या ऑफरखाली तिकीट बुक करता येणार नाही.
एयर एशियाचे सर्वात स्वस्त तिकीट हे कोलकाता ते बागडोर दरम्यानचे आहे. या प्रवासासाठी ९९९ रूपयांतच तिकीट बुक होणार आहे. तर, याशिवाय भुवनेश्वर ते कोलकाता, गोवा ते बंगळुरू, गुवाहाटी ते इंफाळ, हैदराबाद ते बंगळुरू आणि कोच्ची ते बंगळुरू असा प्रवास करण्यासाठी १,०९९ रूपये मोजावे लागतील. याशिवाय पुणे ते बंगळुरू आणि विशाखापट्टनम ते बंगळुरू दरम्यानच्या प्रवासासाठी १,४९९ रूपये इतका तिकीट दर असणार आहे.