Airport Shocking Video : विमानतळावर गेलं असताना अनेक मंडळी तिथं काहीही खायला घेणं टाळतात. तर, एक वर्ग असाही असतो जो विमानतळावर हमखास काहीतरी खायला घेताना दिसतो. मुळात विमानतळावर खाद्यपदार्थ खरेदी करणं म्हणजे खिशाला भुर्दंड हेच अनेकांचं मत. बाहेर 20 रुपयांना मिळणारी एखादी वस्तू किंवा साधा समोसाई इथं 220 ते 250 रुपयांना विकला जातो. पाण्याची बाटली, बिस्कीत इतकंच काय तर वेफर आणि साधी चहा- कॉफीसुद्धा इथं प्रचंड महाग दरात विक्रीसाठी उपलब्ध असते. अशाच एका विमानतळावर एका प्रवाशानं खायला घेण्याचं धाडस केलं आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे घडं या विचारानंच त्याला किळस वाटू लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्स या सोशल मीडिया माध्यमावर @DpgurjarDr नावाच्या एका युजरनं जयपूर विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्यासोबत नेमकं काय घडलं हेसुद्धा या प्रवाशानं सांगितलं आहे. एक ब्रेड पकोडा आणि एक चहा या पदार्थांसाठी या प्रवाशाला जयपूर विमानतळावर 400 रुपये मोजावे लागले. भूकेपोटी त्यानं हे पदार्थ खरेदी केले. पण, ज्या क्षणी त्यानं पहिला घास खाल्ला तेव्हा एक अशी गोष्ट समोर दिसली जी पाहून त्याची भूक तर पळालीच पण प्रचंड किळसही वाटला. 


चहा आणि ब्रेड पकोड्याची ऑर्डर आल्यानंतर या प्रवाशानं ते खाण्यासाठीचा पहिला घास घेतला आणि त्यात काहीतरी वेगळी चव येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. व्यवस्थित पाहिलं असता त्या ब्रेडमध्ये बटाट्यासोबत लहान झुरळही होतं. खायच्या पदार्थात झुरळ पाहताच त्या प्रवाशाला धक्का बसला आणि त्यानं तातडीनं यासंदर्भातील तक्रार केली. 


ग्राहकाची तक्रार येत असतानाही विमानतळावरील कॅफे कर्मचाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं या प्रवाशाचा संताप अनावर झाला. अखेर त्यानं घडल्या प्रकरणाचा व्हिडीओ तयार करत तो थेट सोशल मीडियावर शेअर केला. एका क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पाहणाऱ्यांचाही संताप अनावर झाला. प्रवासी इतके पैसे मोजून हे असं घाणेरडं खाऊ इच्छित नाहीत.... अशा शब्दांत नेटकऱ्यांनी विमानतळ प्रशासनाला फटकारलं. 



हेसुद्धा वाचा : Kurla Bus Accident : कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगल्या चोरतानाचा Video समोर 


हा रोष पाहता अखेर विमानतळ प्रशासनाला जाग. पण, आपण सदर प्रकरणी तपास करत आहोत, संबंधित कॅफेशी संपर्क साधत आहोत अशा शब्दांतील उत्तर त्याला मिळालं. विमानतळ प्रशासनाकडून या प्रवाशाशी संपर्क साधत त्याच्या खाण्याचं बिल आणि तत्सम माहिती मिळवत कॅफे आणि कॅफे कर्मचाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला.