मुंबई : एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी Free Callingची एक खास योजना आणली आहे. या रिचार्ज योजनेची किंमत 456 रुपये आहे. ज्यामध्ये वापरकर्त्याला अमर्यादित कॉलिंगसह (Unlimited Calling) 60 दिवसांची वैधता दिली जाते. यासह, दररोज 50 जीबी डेटा आणि 100 एसएमएस दिले जातात. ही योजना व्होडाफोन आयडियामध्ये उपलब्ध 449 रुपयांच्या योजनेप्रमाणेच आहे.  


एअरटेल 456 ची योजना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज योजना आणली आहे. ज्याची किंमत 456 रुपये आहे. एवढेच नव्हे तर या योजनेत वापरकर्त्याला 50 जीबी डेटासह अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची (Voice Calling)  सुविधा देखील देण्यात आली आहे.


60 दिवसांची वैधता


कंपनीच्या या योजनेची वैधता संपूर्ण 60 दिवसांसाठी आहे. ज्यामध्ये युजर्ससाठी दररोज 100 एसएमएस दिले जातात. 50 जीबी डेटाचा पूर्ण वापर केल्यानंतर वापरकर्त्यास 1 एमबीसाठी 50 पैसे द्यावे लागतील. दररोज 100 एसएमएस संपल्यानंतर ग्राहकाला स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये आणि राष्ट्रीय एसएमएस पाठविण्यासाठी 1.5 रुपये द्यावे लागतील.


हे मिळतील फायदे 


या योजनेत ग्राहकाला संपूर्ण 30 दिवसांसाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनची विनामूल्य ट्रायल दिली जात आहे. यासह या योजनेत वापरकर्त्याला Xstream Premium आणि Wynkम्युझिकमध्ये विनामूल्य प्रवेश देण्यात आला आहे. ही योजना खरेदी केल्यावर ग्राहकांना शॉ अ‍ॅकॅडमीच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांवर एका वर्षासाठी विनामूल्य प्रवेश आणि FASTag रिचार्जवर 100 रुपये कॅशबॅक देण्यात येतो.


येथे मिळणार नवी योजना


एअरटेलची 456 रुपयांची योजना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही योजना रिचार्ज करण्यासाठी वापरकर्ते गूगल पे, एअरटेल थँक्स अॅप, पेटीएम आणि इतर ऑनलाइन अ‍ॅप्स वापरू शकतात.