एअरटेलचे सुधारित दर आजपासून लागू; जाणून घ्या बदलेले दर
दूरसंचार ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने 26 नोव्हेंबरला प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची घोषणा केली होती.
मुंबई : एअरटेलचे सुधारित प्रीपेड रिचार्ज प्लॅन आजपासून महाग झाले आहेत. दूरसंचार ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने 26 नोव्हेंबरला प्रीपेड रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची घोषणा केली होती. आता एअरटेलचा 79 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन 99 रुपयांचा होईल.
प्रीपेड प्लॅनचा दर वाढले
598 रुपयांचा प्रसिद्ध प्रीपेड प्लॅन आता 719 रुपयांना उपलब्ध होणार आहे. एअरटेलने आपल्या सर्व प्रीपेड प्लॅनचे दर महाग केले आहेत.
प्रसिद्ध योजनाही महागल्या
84 दिवसांच्या वैधतेसह एअरटेल प्रीपेड प्लॅनची किंमत आता 455 रुपये इतकी असेल. 598 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 719पये आणि 698 रुपयांच्या प्लॅनची किंमत 839 रुपये आहे.
हा वार्षिक योजनेचा दर
वार्षिक प्रीपेड प्लॅन म्हणजेच 1,498 प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह आता 1,799 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. म्हणजेच तुमचा प्रीपेड प्लॅन थेट 300 रुपये वाचवू शकतो. त्याच वेळी, आता 2,498 रुपयांचा प्लॅन 2,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
टॉपअप प्लॅनचे दरही वाढले
अमर्यादित व्हॉइस बंडल आणि डेटा टॉप-अपचेही समावेश आहे. 48 रुपये, 98 रुपये आणि 251 रुपयांचे व्हाउचर्स आता 58 रुपये, 118 रुपये आणि 301 रुपयांमध्ये उपलब्ध असतील.