Ait Konch Shuttle Railway: रेल्वेने प्रवास करायचं म्हंटल की वेळेवर पोहचले पाहिजे. नाही तर ट्रेन चुकू शकते. तसेच एकदा ट्रेन सुरु झाली की ती स्टेशन आल्याशिवाय थांबत नाही. रेल्वे प्रवादरम्यान काही समस्या निर्माण झाल्यास प्रवासी ट्रेनमधील साखळी खेचतात. यामुळे तात्काळ मोटरमनला धोक्याची सूचना मिळते आणि तो ट्रेन थांबवतो. मात्र, भारतात एक अशी ट्रेन आहे जी प्रवाशांनी हात दाखवल्यावर थांबते. या रेल्वे मार्गावर एकही रेल्वे स्थानक नाही. जाणून घेऊया ही अनोखी ट्रेन भारतातील कोणत्या राज्यात धावते. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील एकमेव महामार्ग ज्याचे काम तब्बल 12 वर्षापासून रखडलयं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे विविध मार्ग आहे. बहुतांश रेल्वे मार्ग हे विविध कारणांमुळे तसेच इथे धावणाऱ्या ट्रेनमुळे वैशिष्टयपूर्ण आहेत. असाच एक रेल्वे मार्ग उत्तर प्रदेशात आहे. या मार्गार रेल्वे स्थानक नाहीत. प्रवाशांनी हात दाखवल्यावर  ट्रेन थांबते. या ट्रेनचे नाव आहे कोंच-एट शटल ट्रेन (Ait Konch Shuttle). 


उत्तर प्रदेशातील जिलौन जिल्ह्यात ही ट्रेन धावते. एंट स्टेशन हे  झांसी-कानपुर रेलमार्गावर येथे. झांसी स्थानाकातून इतर ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन मिळते. 116 वर्षे जुनी ट्रेन देशातील सर्वात छोटी ट्रेन आहे. केवळ तीन डब्यांची ही ट्रेन केवळ 13 किलोमीटरचे अंतर कापते. 116 वर्षे जुनी ट्रेन देशातील सर्वात छोटी ट्रेन आहे. केवळ तीन डब्यांची ही ट्रेन केवळ 13 किलोमीटरचे अंतर कापते. 


ही भारतातील सर्वात स्लो ट्रेन म्हणूनही ओखळली जाते. 13 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी या ट्रेनला 35 मिनिटांचा वेळ लागतो. कोंच ते एट मार्गावर ही एकमेव ट्रेन थांबते. या मर्गावर एकही रेल्वे स्थानक नाही. यामुळे प्रवासी हात दाखवतील तिथे ही ट्रेन थांबवते. इतकचं नाही तर या  ट्रेनचा स्पीड इतका कमी असतो की प्रवासी अगदी हळू हळू धावत देखील ही ट्रेन पकडू शकतात. 1902 मध्ये इग्रंजांनी ही शटन ट्रेन सुरु केली होती. या ट्रेनला 122 वर्ष पूर्ण झाली आहेत.