पैशांचे मुल्य माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही समजते... एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच
सध्या सोशल मीडियावर मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.
मुंबई : पैसा हा प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. ज्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. खरंतर पैसा ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे एखादा व्यक्ती आनंदी राहू शकतो, तर दुसरा दुखी. एवढंच काय तर पैसा भल्याभल्यांना बदलण्यासाठी भाग पाडते. ज्यामुळे बऱ्याचदा कुटुंबातील मंडळी देखील एकमेकांचे शत्रु होतात. तर पैशांमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागतात. आपण आता पर्यंत लोकांनाच पैशांसाठी भांडताना पाहिलं असेल, परंतु तुम्ही कधी प्राण्यांना पैशांचा मोह असलेले पाहिले आहे का? हो तुम्ही बरोबर ऐकलात, तुम्हाला यावरची विश्वास बसत नसेल, तर तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो पाहाच.
सध्या सोशल मीडियावर मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मांजर एका बिळात बसली आहे आणि तिच्या समोर खूप पैसे आहे, ज्यामध्ये काही नोटा आणि काही नाणी आहेत. पुढे या व्हिडीओमध्ये लोक या मांजरीच्या पुढ्यात पैसे ठेवताना तुम्ही पाहू शकता. ती मांजर ज्या कौतुकाने या पैशांकडे पाहात असते, तिची रिएक्शनच फार आश्चर्चकित करणारी आहे.
व्हिडीओत तुम्ही पुढे पाहू शकता की, जेव्हा एक व्यक्ती मांजरीच्या पुढ्यातून जेव्हा पैसे पुन्हा काढून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही मांजर लगेच आपला हात पुढे करते आणि आपल्या पैशांना कोणाला ही हात लावायला देत नाही. मांजरीचं अशा वागण्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
तसे पाहाता मांजर या पैशांनी काहीही विकत घेऊ शकणार नाही, कारण तिला ना माणसांप्रमाणे घर घेण्यासाठी पैसे लागतात, ना आजारासाठी, ना आपलं पोट भरण्यासाठी... मग ती या पैशांचं करणार तरी काय? हे तिलाच माहित परंतु या व्हिडीओवरुन एवढं तरी लक्षात येतंय की, मांजरीला पैशांचं मुल्य माहितीय... मग ते तिच्या कामी येवो अथवा न येवो.
आयएफएस अधिकारी डॉ. सम्राट गौडा यांनी हा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फक्त द्यायचे आहे, परत घेण्यासाठी नाही'. अवघ्या 10 सेकंदाच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटिझन्स याला सरकारच्या कराशी देखील जोडून पाहत आहेत.