मुंबई : मे महिना जवळ आला आहे. ज्यामुळे सर्वांना ओढ लागली आहे ती, गावाकडे जाण्याची. तेथे गेल्यावर फिरायला जाणे, बागडणे लोकांना आवडते. तसेच गावीगेल्यावर विहिरीवर पाणी आणायला जाणे, आंबे गोळा करणे हे देखील लोकांना फार आवडते. गावाला गेल्यावर आपण हे पाहिले असेल की तेथे लोकं काढण्याने म्हणजेच दोरीने ओढूनच विहिरीतून पाणी कढतात. बऱ्याच भागात हल्ली पंप बसवले गेले आहे. परंतु काही भागात अजूनही दोरीने ओढूनच पाणी काढले जाते. ज्यासाठी लोकांना खूपच मेहनत घ्यावी लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो एका जुगाडाचा आहे आणि हा देसी जुगाड रोजच्या पाणी खेचण्याच्या कटकटीतून सगळ्यांना मोकळं करु शकतो.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लाकडाच्या मोठ्या ओंढक्याला या व्यक्तीने सिसॉ सारखा वापर केला आहे. या लाकडाच्या एका टोकाला भांड बंधलं आहे. जो त्या विहिरीत जाईल. तर या लाकडाच्या दुसऱ्या टोकाला वजनदार लाकूडच आहे.


या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती पाणी भरण्यासाठी भांडं खाली टाकतो ज्यानंतर हा सिसॉ सारखं काम करणारा लाकूड त्या पाण्याला विहिरीतून वरती घेऊन येतं. ज्यामुळे जास्त मेहनत न करता विहिरीतील पाणी या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी मदत होते.



या व्यक्तीने केलेला हा जुगाड फारच कमी खर्चीक आहे. ज्यामुळे गावी जर विहिरीतून पाणी काढायचं असेल, तर हा जुगाड वापरुन पाहाण्यासाठी काहीही हरकत नाही. फक्त आपल्या आजूबाजूला असेल्या गोष्टींचा योग्यतोपरी वापर केला की, झालंच तुमचं काम.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर Parveen Kaswan, IFS यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं की, ' पाण्याचे मूल्य...अशा सोप्या पद्धतीने भौतिकशास्त्राचा वापर तुम्ही करु शकता. यंत्रणा समजावून घेण्याचा प्रयत्न करा. राजस्थानात कुठेतरी...'


या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.