बेंगळुरू :  एका बेंगळुरूमधील व्यक्तीसोबत विचित्र प्रकार घडला. आपले 40 पैसे मिळवण्यासाठी या व्यक्तीने अनेक प्रयत्न केले. परंतु त्याचा प्रयत्न असा फसला की, त्याला अखेर हजारो रुपये देऊन सगळा प्रकार शांत करावा लागला. म्हणजे या व्यक्तीसोबत तर असं घडलं की, 'तेलही गेली आणि तूपही'. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, असं नक्की या व्यक्तीसोबत काय घडलं असावं. ज्याची इतकी मोठी भरपाई त्याला करावी लागली? खरेतर एका रेस्टॉरंटने त्या व्यक्तीकडून 40 पैशे जास्त शुल्क आकारल. ज्यामुळे या व्यक्तीने  न्यायालयात खटला दाखल केला. ज्यानंतर न्यायलयाचा वेळ वाया घालवल्यामुळे न्यायालयाने त्या व्यक्तीला 4 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली.


नक्की काय आहे हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना 21 मे 2021 रोजी घडली, जेव्हा मूर्ती नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकाने सेंट्रल स्ट्रीटवरील हॉटेल एम्पायरला भेट दिली आणि टेकवेसाठी जेवणाची ऑर्डर दिली. त्याच्या ऑर्डरची एकूण रक्कम 264.60 रुपये झाली होती, परंतु त्यांना 265 रुपये बिल दिले. तेव्हा मूर्ती यांनी कर्मचार्‍यांना विचारले, परंतु अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बेंगळुरू ग्राहक मंचाकडे रेस्टॉरंटवर ग्राहकांची लूट केल्याचा आरोप दाखल केला.


मूर्ती यांनी सेवेसाठी म्हणून 1 रुपये परत करण्याची मागणी केली. एवढंच नाही, तर या घटनेमुळे त्यांना मानसिक त्रास आणि वेदना झाल्या असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.


यावर  रेस्टॉरंटच्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की, मूर्तीची तक्रार फारच शुल्लक आणि त्रासदायक आहे. कारण रेस्टॉरंटने बिलात सर्विसचे नाही. तर गरजे इतकेच पैसे घेतले.


त्यांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा-2017 च्या कलम 170 अंतर्गत, रेस्टॉरंटने पैसे घेतले आहे. त्यांनी सांगितले की, या नियमांनुसार राऊंड फिगर करण्यासाठी रुपयांपुढे कितीही पैसे झाले तरी, त्याची पुढची रक्कम म्हणजे पूर्ण रुपयात पैसे घेतले जाते. त्यामुळे या व्यक्तीने न्यायालयाचीच दिशा भूल केली असं त्यांनी सिद्ध केलं.


ज्यानंतर न्यायालयाने या व्यक्तीने वैयक्तिक प्रसिद्धीसाठी हा सगळा प्रकार घडवून आणला आहे असे सांगितले, तसेच विरुद्ध पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींचा बहुमूल्य वेळ वाया घालवला आहे. ज्यामुळे त्याला 4 हजाराचा दंड ठोठावला.