ऐकावं ते नवलंच! उंदराला पाण्यात बुडवून मारलं, तरुणाची जेलमध्ये रवानगी
उंदराचं पशूवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन होणार, का होतेय देशभरात या घटनेची चर्चा, वाचा नेमकं काय झालं...
Ajab Gajab News : उंदराला (Rat) पाण्यात बुडवून मारणं एका तरुणाला भलतंच महाग पडलं. तक्रारीवरुन या तरुणाची थेट जेलमध्ये रवानगी करण्यात आली. तब्बल 10 तास त्याला जेलमध्ये काढावे लागले. तरुणाचं नाव मनोज कुमार असं असून तो उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) बदायूं (Budaun) इथं रहातो. या तरुणावर मुक्या जनावारांचा छळ केल्याच्या नियमांतर्गत (Prevention Cruelty Animals Act) कारवाई करण्यात आली नाही, कारण उंदीर या जनावारांच्या श्रेणीत येत नाही. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर अभिप्राय मागवला आला असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
प्राणी प्रेमींनी केली तक्रार दाखल
प्राणी प्रेमी विकेंद्र शर्मा यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. विकेंद्र शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय, आरोपीने उंदराच्या शेपटला दगड बांधला होता आणि त्या उंदराला पाण्यात बुडवत होता. विकेंद्र शर्मा यांनी आरोपी मनोज कुमारला असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण मनोज कुरमाने त्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे अखेर विकेंद्र शर्मा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
तपासासाठी तक्रारकर्त्याने स्वत:च दिले पैसे
विशेष म्हणजे पोलिसांनी मृत उंदराला पाण्यातून बाहेर काढलं आणि शनविच्छेदनासाठी पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठवलं. पण पशू वैद्यकिय रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी उंदराचं शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी 60 किलोमीटर दूर बरेली इथल्या भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थेत (IVRI) पाठवलं. तिथल्या कर्मचाऱ्यांनी रिपोर्टसाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. याप्रकरणी तक्रारकर्ते विकेंद्र शर्मा यांनी स्वत: 225 रुपये खर्च केले आहेत.