मुंबई : UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये श्रुती शर्माने पहिली रँक मिळवली आहे. UPSC ने काही आठवड्यांपूर्वी नागरी सेवा मुलाखत घेतली होती, ज्यामध्ये हजारो उमेदवार उपस्थित होते. मुलाखतीत चांगली कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना यश मिळाले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुलाखतीत देश आणि जगाचे असे अनेक प्रश्न विचारले जातात, जे ऐकल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाखती दरम्यान, उमेदवारांनी अत्यंत सावधगिरीने उत्तरे देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगत आहोत. ज्याची उत्तरं देणं फारच कठीण आहे.


1. अशी कोणती वस्तू आहे जी बाहेर फुकट मिळते आणि रुग्णालयात पैसे देऊन मिळते?


उत्तर: ऑक्सिजन


2. पायाने चव घेणारा प्राणी कोणता?


उत्तर - फुलपाखरू


3. मुलीला स्त्री बनवणारा शब्द कोणता?


उत्तर: वय


4. असे कोणते फूल आहे, जे 12 वर्षांतून एकदा फुलते?


उत्तर- नीलाकुरिंजीचे फूल केरळमधील मुन्नार येथे आढळते आणि ते 12 वर्षांतून एकदा फुलते.


5. जगातील कोणती नदी आपला रंग बदलत राहते?


उत्तर- कोलंबियाची क्रॅनो क्रिस्टल्स नदी प्रत्येक ऋतूत आपला रंग बदलते.


6. शरीराच्या स्नायूंमध्ये कोणते आम्ल साचल्याने थकवा येतो?


उत्तर: लॅक्टिक ऍसिड


7. जगातील सर्वात लांब नदी कोणती?


उत्तर - नाईल नदी


8. मोटर वाहनांमधून कोणता वायू उत्सर्जित होतो?


उत्तर: कार्बन मोनोऑक्साइड