नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील रामपुरच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टी (सपा) चे वरिष्ठ नेता आजम खान यांची तुलना अलाउद्दीन खिलजीशी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर आजम खान यांनीही आपले तोंड उघडले आहे.


खिलजीशी तुलना 



जेव्हा मी पद्मावत सिनेमा पाहत होती तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीला पाहून माझ्या समोर आजम खान यांचा चेहरा यायचा असे जयाप्रदा यांनी म्हटले होते.


जयाप्रदाविरोधात निदर्शन 


यानंतर आजम यांच्या समर्थकांनी जयाप्रदा यांच्याविरोधात मोर्चा काढला. जयाप्रदाविरुद्ध नारेबाजी करत आपला विरोध दर्शविला. 


नाचणारीच्या तोंडी लागत नाही



पण आजम यांनी धक्कादायक विधान केलं. 'मी नाचणारीच्या तोंडी लागत नाही,' असे ते म्हणाले. नाच-गाणं करणाऱ्यांच्या तोंडी लागल तर राजकारण कसं करणार ? अस काहीतरी करा की लोक तुम्हाला आपल्यातला मानतील. अशी पुष्टी त्यांनी जोडली.


अखिलेश बिघडलाय 


 काही दिवसांपूर्वी जयाप्रदा यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांना बिघडलेला मुलगा असे संबोधले होते.


अखिलेश बिघडलेला मुलगा आहे. त्याने भगवान रामपासून शिकायला हवे. जो वडिलांचे वचन निभावण्यासाठी राज दरबार त्यागून वनवासाला गेला.


जयाप्रदा जिंकल्या 


मुलायम सिंह यादव यांचे मित्र राहिलेले अमर सिंह यांनी जयाप्रदा यांना राजकारणात आणले. जयाप्रदा यांनी आजम खान यांचा गड असलेल्या रामपुर येथून सपा च्या तिकिटावर निवडणुक जिंकली.


हाकालपट्टी  


अखिलेश यादव सपाचा अध्यक्ष बनल्यानंतर अमर सिंह आणि जयाप्रदा यांना पार्टीतून काढण्यात आलं. जयाप्रदासोबत अभिनेत्री जया बच्चनही सपा मध्ये आल्या होत्या. पण त्या आजही पार्टीमध्ये आहेत.