नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एक अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न 2020 मध्ये पूर्ण होणार आहे का? हा प्रश्न आहे. कारण पीओकेच्या संदर्भात भारताच्या अनेक कृती योजना पुढे येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची पीओकेबाबत एक मोठी बैठक झाली. अशा परिस्थितीत पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार का याबाबत आशा निर्माण झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जरा भीतीच्या सावटाखाली आहेत. भारताच्या आक्रमक वृत्तीमुळे बाजवा सैन्याची अवस्था ही बिकट झाली आहे. हे प्रकरण मर्यादित असते तर इम्रान खान यांना घाम फुटला नसता. पण इम्रान देखील घाबरून गेले आहेत. कारण त्यांना हे कळून चुकलं आहे की, भारत पीओकेबाबत काही तरी मोठी कारवाई करणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी मिळून पीओकेला पाकिस्तानपासून मुक्त करण्यासाठी योजना तयार केली आहे.


देशाचे हे चार मजबूत आधारस्तंभ एकत्र पीओकेला पाकिस्तानपासून मुक्त करण्याची योजना आखत आहेत. ज्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. आम्ही हे म्हणू शकतो कारण झी मीडियाकडे याबाबत विशेष माहिती आहे की एनएसए अजित डोवाल यांची शनिवारी रात्री मोठी बैठक झाली. डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सैन्य प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, रॉ चीफ, आयबी चीफ, नॉर्दन आर्मी कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी, १५ कोर के जीओसी लेफ्टिनेंट जनरल राजू, १६ कोर कमांडचे लेफ्टिनेंट जनरल हर्ष गुप्ता यांच्यासह जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह देखील उपस्थित होते.
 
5 तासांच्या मॅरेथॉन बैठकीत जम्मू-काश्मीर तसेच नियंत्रण रेषेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. एनएसए डोवाल यांना हिज्बुल कमांडर रियाज नायकू याला ठार केल्यानंतर काश्मीरमधील अतिरेक्यांविरूद्धच्या कारवाईविषयी माहिती देण्यात आली. डोवाल यांना खोऱ्यात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांची यादी देण्यात आली. जैश-ए-मोहम्मदचे 25-30 दहशतवादी काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचू शकतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी डोवाल यांना दिली.


ही माहिती सामायिक केल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी पाकव्याप्त काश्मीरबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी त्यांना सीमारेषेवरील माहितीच्या आधारे सांगितले की, पाकिस्तानने काश्मीरमधील पीओके आणि मोठ्या प्रमाणात नियंत्रण रेषेजवळील दुधाणियाल, शारदा आणि आठकाम येथे अतिरेक्यांचे प्रक्षेपण पॅड सक्रिय केले आहेत. दहशतवादी घुसखोरीचे षडयंत्र रचत आहेत.