Ajit Doval Birthday : अजित डोवाल यांचा पाकिस्तानातील फोटो का शोधला जातोय? कव्वाली ऐकायला गेले आणि...
Ajit Doval : अजित डोवाल या नावाविषयी, या व्यक्तीविषयी आजच्या घडीला अनेकांनाच कुतूहल आहे. भारतीय संरक्षण विभागाबाबत सजग असणाऱ्या डोवाल यांचे काही किस्से पाहाच...
Ajit Doval Birthday : (National Security Advisor ) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, अशी जगभरात ओळख असणाऱ्या अजित डोवाल (Ajit Doval ) यांच्या नावाचा दबदबा प्रचंड आहे. इतका, की त्याविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. शत्रूंसाठी, देशावर वक्रदृष्टी असणाऱ्यांसाठी अजित डोवाल म्हणजे मोठा धोका. गुप्तहेर बनत पाकिस्तानच्या (Ajit Doval in Pakistan) नाकी नऊ आणणाऱ्या डोवाल यांनी त्यांच्या कामानं अनेकांनाच गारद केलं. सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर जेव्हाजेव्हा त्यांच्याविषयी काही गोष्टी सर्च केल्या जातात तेव्हा त्यामध्ये काही मुद्दे आघाडीवर असतात.
ajit doval in pakistan photo सर्च होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. तुम्हीसुद्धा या पर्यायानं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? अर्थात ते गुप्तहेर असल्यामुळं त्यासंबंधीचा अधिकृत फोटो अद्याप समोर आलेला नाही. पण, डोवाल यांच्या आयुष्यातील किस्से मात्र थरकाप उडवणारे आहेत हे मात्र नक्की.
पाकिस्तानात जीव धोक्यात आला, पण...
अंडर कव्हर एजंट म्हणून काम पाहताना डोवाल जवळपास 6 वर्षे पाकिस्तानात होते. एकदा ते दर्ग्यामध्ये कव्वाली ऐकण्यासाठी म्हणून गेले होते. त्यावेळी त्यांनी मुस्लिम तरुणाचा वेश घेतला होता. त्याचवेळी पाकिस्तानचा एक गुप्तहेर त्यांच्यापाशी आला आणि त्यांची खोटी दाढी लटकत असल्याचं सांगितलं. इथं डोवाल यांच्याही काळजाचं पाणी झालं कारण त्यांचं गुपित जवळपास समोर आलं होतं. पण, समोरची व्यक्ती त्यांना फक्त हेच सांगण्यासाठी आली होती. त्याला कल्पनाही आली नाही की ही व्यक्ती हेर आहे आणि त्यामुळंच डोवाल यांचा जीव वाचला.
जेव्हा डोवाल रिक्षाचालक झाले...
1988 मध्ये डोवाल यांनी 'ऑपरेशन ब्लॅक ब्लंडर'चं नेतृत्त्वं केलं होतं. इथं त्यांनी एका रिक्षा चालकाचा वेश धारण करून मंदिरात प्रवेश केला होता. जिथं, दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर ते लक्ष ठेवून होते. पंजाबच्या अमृतसर (Amritsar) येथील सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठीच्या कारवाईमध्ये डोवाल मुख्य भूमिकेत होते.
हेसुद्धा पाहा : INS Vagir : शत्रूला घाम फोडणार भारताचं नवं अस्त्र; नव्या वर्षात नौदलात ग्रँड एंट्री, पाहा पहिली झलक
अजित डोवाल यांच्याविषयी आणखी थोडी माहिती...
मूळचे उत्तराखंडचे असणारे अजित डोवास 1968 बॅचचे IPS अधिकारी आहेत. 1972 मध्ये त्यांनी इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये सेवा स्वीकारली. जास्तीत जास्त काळ ते IB मध्येच राहिले. 1990 ते 1996 या दरम्यान ते पाकिस्तानमध्ये अंडरकव्हर एजंट होते. 2005 मध्ये ते IB च्या संचालक पदावरून निवृत्त झाले आणि 2014 मध्ये त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं.