INS Vagir : शत्रूला घाम फोडणार भारताचं नवं अस्त्र; नव्या वर्षात नौदलात ग्रँड एंट्री, पाहा पहिली झलक

INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी ही पाणबुडी पाहूनच शस्त्रू थरथर कापण्यास सुरुवात होईल. पाहा या अभेद्य पाणबुडीची खास झलक.   

Jan 20, 2023, 11:22 AM IST

INS Vagir : भारतीय नौदलाची (Indian Navy ) ताकद आता आणखी वाढणार असून, नव्या अस्त्रानं शत्रूला घाम फुटणार हे नक्की. कारण, नौदलात 5वी डीझेल-इलेक्ट्रिक स्कॉर्पीन पाणबुडी अवघ्या काही दिवसांनी दाखल होत आहे. आएनएनस वागिर (INS Vagir ) असं या पाणबुडीचं नाव. सदर श्रेणीतील ही शेवटची पाणबुडी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

1/5

आता चीनची खैर नाही

INS Vagir first glimps Indian Navy Project 75 Scorpene

तिथं चीनकडून हिंदी महासागर क्षेत्रात सातत्यानं सामर्थ्य वाढवण्यावर भर देत असताना आयएनएस वागिरची एंट्री होणं भारतीय सैन्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बाब समजली जात आहे.   

2/5

भारतीय नौदलापुढे शत्रू घेणार माघार

INS Vagir first glimps Indian Navy Project 75 Scorpene

सध्याच्या घडीला या पाणबुडीनं सर्व शस्त्रास्त्र आणि सेन्सर चाचण्या पूर्ण केल्या असून, आता ती अॅक्शन मोडमध्ये येणार आहे.   

3/5

नौदलाची ताकद वाढवणार ही पाणबुडी

INS Vagir first glimps Indian Navy Project 75 Scorpene

आतापर्यंत Project-75 अंतर्गत पाच पाणबुड्यांपैकी चार म्हणजेच INS Kalvari, INS Khanderi, INS Karanj, आणि INS Vela या नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. तर पाचव्या पाणबुडीचं म्हणजेच INS Vaghsheer चं बांधकाम अद्यापही सुरु आहे. 

4/5

INS Vagir ची पहिली झलक

INS Vagir first glimps Indian Navy Project 75 Scorpene

French naval defence and energy group कडून या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. INS Vagir (S41) वरूनच या पाणबुडीचं नाव घेण्याचत आलं आहे. ही पाणबुडी 1973 ते 2001 या कालखंडात भारतीय नौदलाच्या सेवेत होती. 

5/5

INS Vagir first glimps Indian Navy Project 75 Scorpene

'साहस शौर्य समर्पण' असं या पाणबुडीचं ब्रीद आहे. इंग्रजीत तेच INS Vagir The hunt begins... म्हणून चर्चेत येतं.