लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022) दरम्यान नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरुच आहेत. यात आणखी एक भर पडली आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी राज्याच्या पोलिसांवरच वादग्रस्त वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुमच्यापेक्षा उद्धट कोणीही नाही'


अखिलेश यादव (Akhilesh Yadav) बुधवारी कन्नौज येथील तिर्वामध्ये सभा घेत असताना पोलिसांवर भडकले. त्यांनी पोलिसांवर राग काढत वादग्रस्त वक्तव्य केलं. अखिलेश यादव यांनी म्हटलं की, 'ए पोलिसांनो, काय तमाशा करताय. तुमच्यापेक्षा उद्धट कोणी असू शकत नाही.'



अखिलेश यादव इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे म्हटलं की, 'भाजपने रेट कार्ड इश्यू केले होते. आठवतंय की नाही. आणि एकाच जातीचे अधिकारी होते. ज्यांनी अन्याय केला होता की नव्हता केला.'


मंचाजवळ अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सभेला संबोधित करत असताना गर्दी वाढत असल्याने पोलीस त्यांना मागे करत होते. पण अखिलेश यादव यांनी पोलिसांवरच राग काढला.