Alien Video: आम्हाला सांगा तुम्हाला अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) ''कोई मिल गया'' (Koi Mil Gaya) चित्रपट आठवतो का? त्यातील जादूने (Jadu) लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी वेड लावलं होतं. चित्रपटातील जादू नावाचा एलियन (Alien)सर्वांनाच आवडला. या चित्रपटानंतर जो तो एलियन्स आहे की नाही यावर बोलू लागले. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये (August) असाच एक कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एलियन दिसल्याची बातमी समोर आली होती. सोशल मीडियावर (Social media) एलियन संदर्भात अनेक व्हिडीओ (Video) दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral)होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. जादू पुन्हा परतला का? आणि यावेळी अनेक जादू जमिनीवर परतले अशी काहीशी चर्चा रंगली आहे. हा रहस्यमय (mysterious) आणि आश्चर्यकारक (Amazing) व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 


Aliens च्या तबकड्यां?


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता आकाशात एकाच रांगेत रंगीबेरंगी काही दिवे दिसत आहे. या दिव्यांना पाहून काही लोकांनी ही एलियनची तबकड्यांची रांग आहे असं म्हटलं. जो तो ही रहस्यमय घटना आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद करु लागले. (aliens return again and mysterious light seen at uttar pradesh treading Video Viral on Social media)


हे चमत्कारी दृश्यं उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) काही शहरांमध्ये दिसल्यानंतर एकच खळबळ माजली. इटावामधील (Etawah) अनेक भागात आकाशात रंगीबेरंगी दिवे (Colorful lights) दिसून आले. हे दृश्यं पाहून लोकांना जादूची आठवण झाली. लढाऊ विमान निघाल्यानंतर असा रंगीत प्रकाश आकाशात दिसतो. औरैयामध्येही (Auraiya) रहस्यमय प्रकाश हा चर्चेचा विषय राहिला आहे.


दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चापोलीसह आजूबाजूच्या अनेक ग्रामस्थांनी हा रहस्यमय दिवे पाहिले. अविश्वसनीय असं हे दृश्यं यापूर्वी कधी न पाहिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही लोक याला नक्षत्र (Nakshatra) म्हणतं आहे तर काही लोक वेगवेगळे तर्क लावतं आहेत. पण अद्याप या आकाशातील प्रकाशाबद्दल काही माहिती मिळाली नाही आहे. 


मात्र आकाशात एलियन्सच्या तबकड्यांची रांग दिसल्याचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही पण पाहा हा व्हिडीओ आणि तुम्हाला काय जाणवलं आम्हाला नक्की सांगा.