नवी दिल्ली: एका बाजालू टक्केवारीच्या स्पर्धेत एका पॉईंटचाही विचार होत असताना अवघ्या वर्गाचाच निकाल शून्य टक्के लागण्याचा विचित्र प्रकार घडला आहे. हरियाणा शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेत हा धक्कादायक प्रकार पुढे आला. हरियाणातील दिघोट येथील शाळेच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला. एकाच वेळी सर्वच्या सर्व विद्यार्थी नापास झाल्याचे समजताच गावकऱ्यांच्या संतापाला पारावार राहिला नाही. गावकऱ्यांनी एकत्र येत थेट शाळेलाच टाळं ठोकलं. विशेष म्हणजे या शाळच्या इयत्ता बारावीच्या वर्गातही असाच प्रकार घडला आहे. एकूण २२ विद्यार्थ्यांपैकी केवळ ९ विद्यार्थीच उत्तर्ण झाले आहेत.


गावकऱ्यांचा रूद्रावतार पाहून शिक्षण अधिकारी हबकले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकालाची माहिती कळताच विद्यर्थ्यांचे पालक आणि ग्रामस्त जोरदार संतापले. सर्व गावकरी जमावाने एकत्र आले आणि त्यांनी शाळेला टाळं ठोकलं आणि तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनाही शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर जाण्यापासून रोखले. गावकऱ्यांचा हा रूद्रावतार पाहून शिक्षण अधिकारीही हबकले. अखेर शाळेचा निकाल शून्य टक्के लागण्यास जबाबदार असलेल्यांना पदावरून हटविण्याचे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले. त्यानंतर ९ तासांनी गावकऱ्यांच्या तावडीतून विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांची सुटका झाली.


शिक्षकांचा अभाव


प्राप्त माहितीनुसार, दीघोट हे २२ हजार लोखसंख्या असलेले गाव आहे. गावात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाला एकाच ठिकाणी आहे. प्राथमिक शाळेत २९६, माध्यमिकमध्ये २११ आणि उच्च माध्यमिक शाळेत २७३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांची सर्व पदे भरली आहेत. मात्र, उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांची पुरेशा प्रमाणात भरती न झाल्याने अनेक पदे रिक्त आहेत. यंदाच्या वर्षी ५१ विद्यार्थ्यांनी १०वी ची परीक्षा दिली. त्यापैकी सर्व ५१ विद्यर्थी अनुत्तीर्ण झाले. तर १२वी परीक्षा दिलेल्या २२ पैकी केवळ ९ विद्यार्थ्यांनाच उत्तीर्ण होता आले.