मुंबई  : एआयएमआयएमचे (Aimim) माजी आमदार आणि नेता वारिस पठाण (Waris Pathan) यांच्यावर शाई फेकली गेली आहे. हा सर्व प्रकार शेजारील राज्यातील अर्थात मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये (Indore) घडला आहे. वारिस पठाण हे आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत दर्ग्यात चादर चढवायला गेले होते. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. या सर्व प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. मात्र उपस्थित लोकांच्या सतर्कतेमुळे शाई फेकणाऱ्याला अटक करण्यात आली. यानंतर त्या आरोपीला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.  (all india majlis e ittehadul muslimeen byculla assembly constituency former mla waris pathan face blackened by man at indore madhya pradesh) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"या घटनेमागे काँग्रेसचा हात"


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारीस पठाण हे मध्य प्रदेशमध्ये आले होते. या दरम्यान त्यांनी अनेकांची भेट घेतली. अनेकांनी आशिर्वाद-शुभेच्छा दिल्या. अनेकांनी काजळ लावला, असं पठाण यांनी स्पष्ट केलं. 



"मी दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी गेलो होतो. तिथे माझे अनेक समर्थकही होते. तुम्हाला काजळ लावायचा आहे जेणेकरुन तुम्हाला कोणाची दृष्ट लागणार नाही.   यानंतर मी तोंड धुतलं. याचा चुकीचा अर्थ काढला गेला. तसंच या सर्व प्रकारामागे काँग्रेसचा हात आहे", असंही पठाण यांनी स्पष्ट केलं.       


तपास सुरु 


दरम्यान या सर्व प्रकरणी स्थानिक पोलीस तपास करत आहेत. पठाण यांच्यावर शाईफेक करणारा आरोपी हा पटेल कॉलनीचा रहिवाशी आहे. ज्याचं नाव सद्दाम आहे. सद्दाम मजुरीचं काम करतो. मला ही व्यक्ती आवडत नाही जो नेहमी देशाविरुद्ध वक्तव्य करुन मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम करतो, म्हणून मी पठाण यांच्यावर शाईफेक केली, असं सद्दामने चौकशीदरम्यान उत्तर दिलं", अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.    


नक्की काय बोलले होते?


कर्नाटकातील गुलबर्ग्यात 20 फेब्रुवारी 2020 रोजी एका जनसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेदरम्यान पठाण यांनी चिथावणीथोर आणि दोन समाजात तेड निर्माण होईल, असं विधान केलं होतं.  "100 कोटी हिंदुंवर 15 कोटी मुस्लिम भारी पडतील",असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं होतं. 


आता आम्ही 'जोरदार उत्तर द्यायला शिकलो आहोत.  पण लक्षात ठेवा तुम्हाला एक होऊन रहावं लागले. स्वातंत्र्य घ्यावं लागेल आणि जे मागून मिळत नाही ते ओरबाडून घ्यावं लागेल. आता वेळ आली आहे, असे सांगून माता-भगिनींना पुढे पाठवले आहे. अरे भाऊ, आता फक्त सिंहीण बाहेर पडल्या आहेत आणि तुम्हाला घाम फुटला आहे.  दोन्ही लोकं एकत्र आले तर काय होईल, हे तुम्ही समजून समजून घ्या. 15 कोटी आहेत पण ते शंभर कोटींवर भारी आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा", असं वारीस पठाण म्हणाले होते.