अटलजींना ज्येष्ठ नेते, राजकारणी, खेळाडू, कलाकारांची श्रद्धांजली
अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपलं दु:ख व्यक्त करत अटलजींना श्रद्धांजली दिली आहे
नवी दिल्ली : अटलजींच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. अटलजींच पार्थिव उद्या सकाळी भाजपा मुख्य कार्यालयात आणण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजता विजय घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपलं दु:ख व्यक्त करत अटलजींना श्रद्धांजली दिली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी आपल दु:ख व्यक्त केलंय. एक महान व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्याची जाणिव देशवासियांना आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभरात प्रार्थना करण्यात येत होती.
मी नि:शब्द, शून्य झालो आहे, असे ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. भारताचा थोर सुपुत्र हरपल्याचे ट्वीट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. अभिनेता रजनिकांत, विक्रम गोखले यांनीही आपलं दु:ख यावेळी व्यक्त केलंय.
आठवणींना उजाळा
अद्भुत व्यक्तिमत्व हरपल्याचं दु:ख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. यासोबतच त्यांनी अटलजींसोबतचा आपला एक जुना फोटोही शेअर केलायं.
पिता गेल्याचं दु:ख
अटलजींच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलंय. ते माझ्यासाठी पित्यासमान होते, त्यांनी मला मुलीसारखे मानले. मला पुन्हा पिता गेल्याचे दु:ख यावेळेस होत असल्याचे लता मंगेशकर यांनी म्हटले.
सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी
अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.