संपत्ती ही एक अशी गोष्ट आहे, जी मधे आली तर अनेक नात्यांमध्ये कडवटपणा येतो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर संपत्तीचा मोह आवरता येत नाही. यातील काही प्रकऱणं सामंजस्याने मिटवली जातात, तर काही प्रकरणं मात्र हाणामारीपर्यंत जातात. काही वाद थेट कोर्टाची पायरी चढतात. यातील काही प्रकरणं पाहिल्यावर न्यायाधीशांनाही आश्चर्य वाटतं. नुकतंच असं एक प्रकरण कोर्टात पोहोचलं ज्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले आणि बहुतेक कलयुग आलं अशी टिप्पणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलाहाबाद उच्च न्यायालयाने 76 आणि 80 वयाच्या वृद्ध जोडप्याच्या पोटगी प्रकरणावर सुनावणी करताना एक अनोखं निरीक्षण केले. न्यायालयाने अशा कायदेशीर लढाया चिंतेची बाब आहे असं सांगताना वयाचा संदर्भ देत "कलयुग आलं आहे असं दिसतंय" असंही म्हटलं. यावेळी त्यांनी हिंदू धर्माचा उल्लेखही केला. 


80 वर्षीय मुनेश कुमार गुप्ता हे निवृत्त आरोग्य निरीक्षक आहेत. 2018 पासून त्यांच्यात आणि त्यांची 76 वर्षीय पत्नी यांच्यात संपत्तीवरुन वाद सुरु आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. यानंतर त्यांना कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आलं होतं. 


हा वाद मिट नसल्याने मुनेश कुमार गुप्ता आणि त्यांची पत्नी वेगवेगळे राहू लागले होते. पण नंतर महिलेने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. महिलेने पतीकडून 15 हजारांच्या पोटगीची  मागणी केली आहे. मुनेश कुमार गुप्ता यांची महिन्याची पेन्शन 35 हजार आहे. 


16 फेब्रुवारीला कोर्टाने आपल्या आदेशात गुप्ता यांना 5000 रुपये पोटगी देण्यास सांगितले. मात्र त्यांनी या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले, "कलयुग आलं असं दिसत आहे. अशा कायदेशीर लढाया चिंतेचा विषय आहे". त्यांनी महिलेला नोटीस बजावली आणि पुढील सुनावणीपर्यंत हे जोडपे तोडगा काढतील अशी आशा व्यक्त केली.


अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकिल अॅड.  अमित  कटारनवरे म्हणाले,  'पुरावे नष्ट होऊ नये म्हणून  मृतदेह पुरणार आहे.  अक्षयच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार आहे.  ज्यामुळे भविष्यात भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह  पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आम्हाला  आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे. त्यासाठी कुटुंबाचा  हा प्रयत्न आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करुन ठेवू म्हणून आम्ही दहन करणार नाही तर पुरणार आहे.