नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतीम टप्प्यात काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान मोदींवर मशरूम हल्ला केला. पण या हल्ल्याला तायवानच्या एका महिलेने उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पेशने ठाकोर यांनी मोदीच्या खानपानावर निशाणा साधत म्हटले की मोदी तायवानहून इम्पोर्ट केले मशरूम खातात आणि मोदी जे मशरूम खातात त्याच्या एका मशरूमची किंमत ८० हजार रुपये आहे. 


'मशरूम खाल्ल्यामुळे मोदी गोरे'


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधी माझ्यासारखेच कृष्णवर्णीय होते, पण आयात केलेले मशरूम खाल्ल्यामुळे मोदी आता गोरे झाले आहेत, असा दावा अल्पेश ठाकोर यांनी केला आहे.


'एवढ्या रुपयांना मिळतात मशरूम'


पंतप्रधान नरेंद्र मोदी खात असलेले हे मशरूम तायवानहून येतात. मोदी दिवसाला पाच मशरूम खातात. या एका मशरूमची किंमत ८० हजार रुपये आहे, असं हास्यास्पद वक्तव्य अल्पेश ठाकोर यांनी केलं आहे.


तायवानच्या महिलेचे उत्तर 


अल्पेश यांच्या या वक्तव्यावर तायवानच्या एका महिलेने प्रतिहल्ला केला आहे. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या या २७ सेकंदाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपचे प्रवक्ता तेजिंदर सिंह बग्गा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. 


 



काय म्हणाली महिला... 


व्हिडिओमध्ये तायवानच्या महिलेने सांगितले की, मी मेसी जो आहे, मी तायवानची रहिवाशी आहे. मी भारतातील एक बातमी पाहिली. त्यात भारतीय नेता तायवानचा एक असा मशरूम आहे त्याची किंमत १२०० डॉलर आहे. तुम्ही हे मशरूम खाल्ले तर तुम्ही गोरे होता. मी माझ्या देशात अशी कोणतीही गोष्ट ऐकली नसेल हे अशक्य आहे. यासाठी माझ्या देशाचा  आपल्या राजकारणासाठी  वापर करू नये.