नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताच्यावतीने त्यांना चोख प्रत्तुत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्याचा निषेध नोंदवताना यात्रा सुरूच ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी वेळापत्रकानुसार यात्रेकरूची गट कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथच्या दिशेनं रवाना झाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू बालताल मार्गावर हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलीय. त्याचप्रमाणे देशात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर महामार्ग बंद करण्यात आला आहे. देशातही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. हल्ल्यानंतर विश्वहिंदू परिषदेकडून जम्मू बंदची हाक दिली आहे. हल्लयानंतरही अमरनाथ यात्रा सुरुच रहाणार, असे मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांनी ठणकावून सांगितलेय. अमरनाथ यात्रेसाठी नवा गट रवाना झालाय.  


जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू तर १९ जखमी झालेत. मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांनी जखमींची भेट घेतली.  



अमरनाथ यात्रेकरुंना दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरुंवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भ्याड हल्ला केला. यात ७ भाविकांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झालेत. मृतांमध्ये ६ महिलांचा समावेश आहे. मृत महिलांमध्ये पालघरच्या निर्मला ठाकूर आणि डहाणूच्या उषा सोनकर यांच्या व्यतिरिक्त उरलेल्या पाच महिला यात्रेकरु गुजरातमधील वलसाडच्या रहिवासी आहेत. 


रात्री ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास बस बेटूंग गावाजवळून जात असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सात प्रवासी जागीच ठार झाले. तर ५६  पैकी १९ जणांना इजा झालीय. हल्ल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहचले. त्यांनी स्थानिकांच्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं.  या भ्याड हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय.