श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्रीअमरनाथ श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा 21 जुलैपासून सुरु होणार होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी जूनमध्ये श्राइन बोर्डाने बालटाल भागातून यात्रेचा मार्ग निश्चित केला होता. पण रस्ता पूर्णपणे तयार नसल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर २१ जुलैपासून यात्रा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेसाठी याठिकाणी कोविड रुग्णालय देखील उभारण्यात आलं होतं.


स्थानिक लोकांनी यात्रेबाबत चिंता व्यक्त केली होती. यात्रेला आलेल्या श्रद्धाळूंवर येथे क्वारंटाईन होण्याची वेळ येऊ नये. असं स्थानिकांचं मत होतं.


अमरनाथ हे हिंदुंसाठी तीर्थक्षेत्र आहे. काश्मीरमध्ये समुद्रसपाटीपासून 13,600 फुट उंचीवर हे तीर्थक्षेत्र आहे. अमरनाथ गुहा ही भगवान शिव यांच्या काही प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. याच ठिकाणी भगवान शिव यांनी माता पार्वती यांना अमरत्वचं रहस्य सांगितलं होतं. असं म्हटलं जातं. या पवित्र गुहेत प्राकृतिक शिवलिंग निर्मिती होते. याला स्वयंभू हिम शिवलिंग देखील म्हटलं जातं. आषाढ पोर्णिमेला ही यात्रा सुरु होते तर रक्षाबंधनपर्यंत संपूर्ण श्रावण महिना या ठिकाणी या पवित्र हिमलिंग दर्शनासाठी लाखो लोकं येतात..