खुशखबर! Amazon Sale मध्ये स्वस्तात खरेदी करु शकता आयफोन
Amazon fab phone fest Sale सुरु, पहिल्यांदाच या मॉडेलवर मिळतोय डिस्काऊंट
नवी दिल्ली : अमेझॉन फॅब फोन फेस्ट (Amazon Sale) सुरु झाला आहे. चार दिवस असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. Amazon sale मध्ये ऍपल, सॅमसंग, शाओमी, रियलमी आणि इतर कंपन्यांच्या मोबाईल फोनवर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे. आयफोन ११ प्रो मॅक्स स्मार्टफोन पहिल्यांदा डिस्काऊंटमध्ये या सेलमध्ये मिळणार आहे.
आयफोन ११ प्रो मॅक्स ३ हजार रुपयांच्या डिस्काऊंटवर खरेदी करता येऊ शकतो. iphone phone 11 pro max या स्मार्टफोनची किंमत १,०९,९०० रुपये इतकी आहे. जो Amazon saleच्या डिस्काऊंटमध्ये १,०६,९०० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. ६४ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनवर हा डिस्काऊंट आहे.
आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना iphone phone 11 pro max वर १५०० रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट मिळणार आहे.
अमेझॉन फॅब फोन फेस्ट सेलमध्ये, आयफोन ११ प्रो, आयफोन एक्स आर, आयफोन एक्स एस आणि आयफोन ७वरही डिस्काऊंट मिळतो आहे.
Apple iPhone XR फोन ४५,९०० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.
iphone 11 pro ९६,९०० रुपयांत उपलब्ध आहे. सेलमध्ये या फोनवर ३ हजारांचा डिस्काऊंट मिळतोय. पण iphone 11 proच्या स्पेस ग्रे आणि सिल्व्हर रंगाच्या मॉडेलवर हा डिस्काऊंट आहे.
सेलमध्ये iPhone XS ५१२ जीबी स्टोरेज असणारा फोन ९७,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. या फोनची सध्याची किंमत १,३४,९०० रुपये आहे.
ऍपल iPhone 7 या सेलमध्ये २७,९९९ रुपयांत उपलब्ध आहे.