नोकरीची मोठी संधी, अॅमेझॉन देणार 1 लाखांपेक्षा जास्त जॉब
Job in Amazon India : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी Good News आहे.
मुंबई : Job in Amazon India : जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी Good News आहे. जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन नोकरीची संधी घेऊन आली आहे. सणासुदीच्या आधी 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना अॅमेझॉन नोकरी देणार आहे. ऑनलाईन शॉपिंगची वाढती गरज पाहता अॅमेझॉन कंपनी 1.10 लाख लोकांना नोकरीची संधी देणार आहे. (Amazon India announces creation of 1,10,000 new jobs ahead of festive season)
अॅमेझॉन इंडियाने (Amazon) भारतात नोकरीची ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. अॅमेझॉन भारतात 1,10,000 लोकांना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. देशातील एकूण 35 शहरांमध्ये कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात भरती केली जाणार आहे.
यामध्ये लोकांना पार्ट टाईम आणि फुल टाईम नोकरी करता येणार आहे. कंपनी पुणे, मुंबईसह देशभरात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. 2025 पर्यंत 10 लाख लोकांना नोकरी उपलब्ध करण्याचे अॅमेझॉनचं उद्दिष्ट्य आहे.
यात मुंबई आणि पुणेसह दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई सारख्या या मोठ्या शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकरीचा समावेश आहे. 1,10,000 हून अधिक हंगामी नोकरीची (seasonal job) संधी निर्माण झाली आहे.