नवी दिल्ली : 'ऍमेझॉन' कंपनी जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाते. दरम्यान कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे प्रत्येक जण ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देत आहे. ऑनलाईन शॉपिंगची वाढती गरज पाहता 'ऍमेझॉन' कंपनी १ लाख लोकांना नोकरीची संधी देणार आहे. यामध्ये लोकांना पार्ट टाईम आणि फुल टाईम नोकरी करता येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यामध्ये पॅकिंग आणि कमी वेळात ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला मदत होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये कंपनीला मोठा फयदा झाला आहे. यामागचे कारण असे आहे की कोरोना साथीच्या काळात लोक किराणा अथवा अन्य महत्वाच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांना प्राधान्य देत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने १.७५ लाख लोकांना नोकर्‍या दिल्या आहेत.


ऍमेझॉनने अलीकडेच म्हटले होते की कंपनीने तांत्रिक आणि इतर पातळीवर ३३ हजार लोकांना भर्ती करण्याची आवश्यकता आहे. ऍमेझॉनने सांगितले की या महिन्यात १०० नवीन गोदामे, पॅकेज सेंटर आणि इतर सुविधा केंद्र सुरू होत आहेत. यासाठी लोकांची गरज आहे.