नवी दिल्ली: गेल्या वर्षी मिळालेल्या प्रतिसादानंतर अॅमेझॉन यंदाही प्राईम डे सेल घेऊन येत आहे. यंदाच्या सेलमध्ये पहिल्यांदाच २०० प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे. अॅमेझऑन प्राईम डे असे या सेलचे नाव असून, तो १६ जुलै पासून सुरू होत आहे. दरम्यान, हा सेल प्राईम मेंबर्ससाठीच असणार आहे. भारतात प्राईम डे सेल १६ जुलैला दुपारी १२ वाजता सुरू होईल. तो १८ जुलैला दुपारी १२ पर्यंत सुरू असेन. केवळ ३६ तासांसाठी सुरू असलेल्या या सेलमध्ये अनेक वस्तूंवर शानदार सूट दिली जाईल. १६ जुलैला दुपारी १ वाजलेपासून वेगवेगळे ६ फ्लॅश सेलही आयोजित करण्यात येतील. याशीवाय एचडीएफसी बँक कार्ड / एटीएमवर १० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. सोबतच अॅमेझऑन पेवरही यूजर्स पेमेंट करू शकतात.


२०० प्रोडॉक्ट्सचा पहिल्यांदाच समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅमेझऑन डे २०१८मध्ये २०० नवे प्रोडक्ट भारतात पहिल्यांदाच पेश होत आहेत. या प्रोडोक्ट्समध्ये OnePlus, Sennheiser, WD, Godrej, Cloudwalker, Seagate, Samsung याशिवाय Home & Kitchen, Daily Needs, Fashion & Lifestyle सारखे प्रोडोक्ट्सही उपलप्ध असतील. अॅमेझॉन इंडियाच्या अॅपवर एका कॉन्टेस्टच्या माध्यमातून यूजर्सना बक्षिस जिंकण्याचीही संधी आहे.


यूजर्सना बक्षिस जिंकण्याचीही संधी


अॅमेझॉन प्राईम व्हिडिओसाठी सात नवी टायटल (एकच दिवस) १० जुलैपासून कॅटलॉगमध्ये समाविष्ट केले जाईल. यात Dunkirk, 102 Not Out, Comicstaan, Transformers: The Last Knightसारख्या टायटल्सचाही समावेश असेल. अॅमेझॉन प्राईम म्यूझिकसाठीही खास ऑफर आहे. ३ आणि १५ जुलै दरम्यान ग्राहक म्यूझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ३ गाणी लाऊन इको डॉट्सही जिंकू शकतात. फायर टीव्ही स्टीक आणि कंपनीच्या इको रेंज आदींप्रमाणे अॅमेझॉनवर इतर ऑफर्सही मिळतील. पण, या ऑफर्सबाबत सध्यातरी फारशी माहिती उपलब्ध नाही. पण, काही ऑफर्स प्राईम डेच्या काही काळ आगोदर सुरू होतील.