मुंबईः ऑनलाइन शॉपिंगमध्ये किंमतीत चढ-उतार होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु काही वेळा किंमत इतकी वाढते की लोकांना अंदाजही येत नाही. असेच काहीसे Amazon India वर नुकतंच घडलंय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन शॉपिंगमुळे आता लोक कोणत्याही ठिकाणाहून आणि कधीही भेटवस्तू किंवा वस्तू खरेदी करू शकतात. यामुळे लोकांचे जीवन थोडे सोपे झाले आहे. ऑनलाइन वेबसाइटवरून खरेदी करणे आता लोकांसाठी एक सवय बनत आहे.


महागड्या किमतीतही लोक स्वस्त वस्तू घेण्यास तयार असतात. यामुळेच ऑनलाइन शॉपिंग कंपन्या लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी अनेक विचित्र गोष्टी करतात.


ई-कॉमर्समध्ये सर्वात सामान्य समस्या अशी आहे की जेव्हा आवडत्या वस्तूची मागणी जास्त असते तेव्हा स्टॉक संपतो आणि मग लोकांना त्याची प्रतीक्षा करावी लागते. कधी-कधी मागणी जास्त असताना किंमतही वाढवली जाते. 



असेच काहीसे Amazon India वर नुकतेच घडले. नेटिझन्सना आता महागड्या लक्झरी उत्पादने ऑनलाइन पाहण्याची सवय झाली असताना, अनेकांना  Amazon वर 25,900 रुपयांना एक बादली विकली जात असल्याचं पाहून धक्का बसला.


फोटोमध्ये दिसतंय की, लाल बादली 25,999 रुपयांना विकली जात आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या बादलीची खरी किंमत 35,900 रुपये होती, जी 28 टक्के सूट देऊन विकली जात आहे.


याशिवाय ही बादली खरेदी करण्यासाठी लोकांना ईएमआयचा पर्यायही दिला जात आहे. बकेटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केल्यानंतर लगेचच, काही नेटकऱ्यांनी माहिती दिली की  तांत्रिक बिघाडामुळे हे घडलंय 


काही नेटिझन्सनी सांगितले की, हे प्रॉडक्ट आता हटवण्यात आलं असून काही नेटिझन्सनी ट्विटरवर याबद्दल 'रिव्ह्यू' दिले आहेत.