स्वातंत्र्यदिनाला कोणती साडी नेसू? - अमेरिकी दूतावासातील अधिकारीही साड्या पाहून पेचात !
`साडी` हा अनेक भारतीय महिलांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण आता भारतीय महिलांप्रमाणेच दिल्ली येथील अमेरिकी दूतावासात कार्यवाहक राजदूत या उच्चपदावर असणाऱ्या मॅरिके कार्लसन यांनादेखील अस्सल भारतीय आणि पारंपारिक साड्यांनी आकर्षित केलं आहे.
नवी दिल्ली : 'साडी' हा अनेक भारतीय महिलांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण आता भारतीय महिलांप्रमाणेच दिल्ली येथील अमेरिकी दूतावासात कार्यवाहक राजदूत या उच्चपदावर असणाऱ्या मॅरिके कार्लसन यांनादेखील अस्सल भारतीय आणि पारंपारिक साड्यांनी आकर्षित केलं आहे.
येत्या स्वातंत्र्यदिनाला मॅरिके कार्लसन यांना साडी नेसून सहभाग घ्यायचा आहे. त्यासाठी नुकतीच त्यांनी खादी इंडियाला भेट दिली. पण विविध नक्षीकाम आणि कापडांचे वैविध्य पाहून नेमकी कोणती साडी निवडावी याबाबत त्यांचा गोंधळ होतोय. मॅरिके कार्लसन यांनी कांजीवरम, टसर, जामदानी आणि डुपियन या चार साड्यांची निवड केली आहे. मात्र त्यापैकी कोणती एक निवडावी हा पेच मात्र अजूनही आहे.
'मला साडी नेसण्याचा पूर्वानुभव नाही. पण भारतीय साड्यांनी मला भलतेच आकर्षित केले आहे. त्यामुळे मी कोणती साडी नेसून स्वतंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे हे भारतीयांनीच मला सांगावे' असा खास संदेश मॅरिके कार्लसन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.
कशी कराल मॅरिके कार्लसन यांना साडी निवडायला मदत ?
@USAmbIndia या ट्विटर हँडलवर किंवा http://www.facebook.com/India.usembassy/ या फेसबुक पेजला भेट द्या
- त्यावर तुमचा अभिप्राय नोंदवा.
सर्वाधिक पसंती मिळणारी साडी कार्लसन स्वातंत्र्यदिनी नेसणार आहेत.