अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यश्र डोनाल्ड ट्रम्प donald trump यांनी सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं. एअर फोर्स वनच्या एका विमानाने ते सपत्नीक भारतात आले. यावेळी त्यांची मुलगी आणि जावईही सोबत होते. अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रम्प यांचं आगमन झालं आणि मोठ्या उत्साहात त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी इतरही मान्यवरांची उपस्थिती होती. शिवाय भारतीय संस्कृतीची झलकही ट्रम्प यांच्यापुढे सादर करण्यात आली. एकिकडे विमानतळावर शासकीय स्वागताचा स्वीकार करत असतानाच दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं सोशल मीडियावरही धडाकेबाज अंदाजात स्वागत करण्यात आलं. 


पाहा असं झालं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत 


#TrumpInIndia #NamasteyTrump असे हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले. ज्याअंतर्गत एकिकडे ट्रम्प यांच्या येण्याच्या बातम्यांनी जोर धरला तर, दुसरीकडे नेटकऱ्यांची कल्पकता विनोदी मीम्सच्या रुपात पाहायला मिळाली. ट्रम्प विमानतळावर पोहोचताच बाहेर रिक्षावाले त्यांना कसे बोलवतील इथपासून ट्रम्प यांचा अंदाज कसा असेल इथपर्यंत प्रत्येक गोष्टीवर भाष्य करत नेटकऱ्यांनी हे मीम्स पोस्ट करण्यास सुरुवात केली. 






दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून विविध प्रकारची तयारी करण्यात येणार होती. सुरक्षा व्यवस्थेपासून ते अगदी ट्रम्प यांच्यासाठी खास मेजवानीचा बेत आखेपर्यंतचा समावेश यामध्ये होता. अखेर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आणि या घटनेकडे साऱ्या जगाचं लक्ष वेधलं गेलं.