#NamasteyTrump : डोनाल्ड ट्रम्प येती घरा....

Feb 24, 2020, 12:37 PM IST
1/5

#NamasteyTrump : डोनाल्ड ट्रम्प येती घरा....

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याचा क्षण अखेर प्रत्यक्षात जवळ आलाच. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रम्प यांचं समपत्नीक आगमन झालं. यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं. (सर्व छायाचित्रे- एएनआय) 

2/5

#NamasteyTrump : डोनाल्ड ट्रम्प येती घरा....

एअर फोर्स वनच्या खास विमानाने प्रवास करत ट्रम्प यांनी भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच मोदींनी आलिंगन देत त्यांचं या विविधतेने नटलेल्या देशात स्वागत केलं. ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त यावेळी त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई जॅरेड कुशनर यांचंही स्वगात करण्यात आलं. (सर्व छायाचित्रे- एएनआय) 

3/5

#NamasteyTrump : डोनाल्ड ट्रम्प येती घरा....

काही औपचारिक शिष्टाचारांसह ट्रम्प यांचं स्वागत झालं तेव्हा या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि इतरही काही मान्यवरांची उपस्थिती होती. (सर्व छायाचित्रे- एएनआय) 

4/5

#NamasteyTrump : डोनाल्ड ट्रम्प येती घरा....

भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत काही कलाकारांनी मोठ्या उत्साहात त्यांच्या कलेचा नजराणा ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी सादर केला. (सर्व छायाचित्रे- एएनआय) 

5/5

#NamasteyTrump : डोनाल्ड ट्रम्प येती घरा....

विमानतळावर झालेल्या शासकीय स्वागताचा स्वीकार करत पंतप्रधान नरेंद्र, विशेष अतिथी डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य मान्यवरांच्या वाहनांचा ताफा साबरमती आश्रमाच्या दिशेने निघाला. (सर्व छायाचित्रे- एएनआय)