म्हैसूर : कर्नाटक विधानसभा निवडणूक रणरंग्रामाला सुरुवात झालेय. काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेय. भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका करण्याचा धडाका लावलाय. मात्र, काँग्रेसवर टीका करताना भाजप चांगलीच तोंडघशी पडली. खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी येडियुरुप्पा सरकार भ्रष्टाचार युक्त म्हटले. तर मोदी दलित असून ते विकास करु शकत नाही, असे भाजप खासदाराने भाषांतर करुन भाजपचे हसे करुन ठेवले. त्यामुळे भाजप बॅकफूटवर आली. असे असताना पुन्हा अमित शाह यांनी प्रचाराच मुद्दा उचलून रान उठविण्यास सुरुवात केली. आता तर काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविताना  राज्यात दोन डझनहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात आलेलं नाही. राज्यात आमची सत्ता आल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून तुरुंगात डांबू, असा इशारा अमित शहा यांनी आज येथे दिला. 


भाजपचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. 'काँग्रेसच्या काळात राज्यात दोन डझनहून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोरांना अद्याप पकडण्यात आलेलं नाही. राज्यात आमची सत्ता आल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या मारेकऱ्यांना पाताळातून शोधून तुरुंगात डांबू,' असा इशारा त्यांनी दिलाय.


'ती काँग्रेसची घोडचूक असेल'


कर्नाटक सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरत आहे. राज्यात हत्यांचं सत्र सुरू आहे. त्याचा मी निषेध करतो. राजकारणात हिंसेला कोणताच थारा नाही. हिंसेद्वारे भाजपच्या विचारधारेला रोखता येईल, असे काँग्रेसला वाटत असेल तर ती त्यांची घोडचूक आहे, असा सल्ला शाह यांनी दिला. दरम्यान, मुख्यमंत्री 'सिद्धरामय्या सरकारचा अंत जवळ आलाय. लवकरच राज्यात भाजपचं सरकार स्थापन होईल,  असा दावा शाह यांनी यावेळी केला.


राहुल गांधी यांच्यावर टीका


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही शाह यांनी यावेळी टीका केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस २०१४ पासून निवडणुका लढत आहे आणि तेव्हापासून काँग्रेस पराभूत होत आहे. आता कर्नाटकमध्ये पराभूत होण्याची त्यांची वेळ आली आहे, असे ते म्हणालेत.