गुजरात : गुजरातची निवडणूक भाजपसाठी किती महत्वाची आहे याची प्रचिती आता येऊ लागलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी प्रचारासाठी थेट संपर्कावर भर देण्याचं ठरवलंय. आजपासून अमित शाहांच्या गुजरात गौरव महासंपर्क अभियानाला सुरुवात झालीय.


अहमदाबादच्या नारनपुरा भागात अभियानाचा आरंभ करण्यात आलाय.. अमित शहा दारोदारी जाऊन मतदारांना मतांचा जोगवा मागत आहे. खरंतरं निवडणूकीला अजून बराच अवकाश आहे. पण स्वतः अमित शाहा आजपासूनच रस्त्यावर उतरले आहेत. आजच्या पदयात्रेलाही मोठ्या संख्येनं हजर आहेत. अहमदबादच्या रस्त्यावर भाजपनं आपलं शक्तीप्रदर्शन सुरू केलंय.