नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या एका भाषणात महात्मा गांधी यांचा उल्लेख 'चतुर बनिया' असा केला. त्यामुळे, काँग्रेस नेते चांगलेच चवताळलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी, छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एका कार्यक्रमात अमित शाह यांनी 'गांधी चतुर बनिया होता. गांधीला माहीत होतं की काँग्रेसची स्थिती पुढे जाऊन काय होणार आहे. यामुळे त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच म्हटलं होतं की काँग्रेसला परसवावं लागेल... महात्मा गांधीनं हे नाही केलं, परंतु, आता मात्र काही लोक हे काम करत आहेत. काँग्रेसची कोणतीही तत्त्वं नव्हती, सिद्धांताच्या आधारावर हा पक्ष उभा राहिला होता, म्हणूनच गांधींनी हे म्हटलं होतं' असं वक्तव्य अमित शाह यांनी केलंय. 


यावरुन काँग्रेस नेते चांगलेच चवताळलेत.