Shraddha Walker : `त्या` एका गोष्टीमुळे मुंबई पोलिसांची चौकशी?; अमित शाह यांचे संकेत
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होतं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हत्येसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलं आहेत.
Amit Shah On Shraddha Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा बहुचर्चित श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याप्रकरणी आताची सर्वात मोठी बातमी. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police)कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. खुद्द केंद्रीय अमित शाह (Amit Shah ) यांनी श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात संकेत दिले आहेत. 'मुंबई आणि दिल्ली पोलिसांमध्ये (Delhi Police) समन्वयचा अभाव आहे', असं शाह यांनी म्हटलं आहे.
'त्या' एका गोष्टीमुळे मुंबई पोलिसांची चौकशी?
श्रद्धा वालकर प्रकरणावर (Shraddha Murder Case) माझी नजर असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. त्याशिवाय या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. श्रद्धा हिने मुंबईतील वसई पोलीस ठाण्यामध्ये 2020 मध्ये आफताबची लेखी तक्रार केली होती. ''त्या तक्रारीमध्ये श्रद्धाने सांगितलं होतं की तिचे तुकडे-तुकडे करुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि तिच्या जीवाला धोका आहे. या तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यावेळी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. 2020 मध्ये आमचं सरकार नव्हतं. पण यासाठी जो कोणी जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल'', असं संकेत अमित शाह यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांची चौकशी होण्याची चर्चा रंगली आहे. (Amit Shah on Mumbai Police failed Shraddha Walker murder case maharashtra police Delhi Police trending news)
''मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह''
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही श्रद्धा वायकर हिने लिहिलेल्या पत्रावर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या कथित अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलिसांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.
दरम्यान याबाबत झी 24 तासकडे त्याची Exclusive प्रत आहे. या तक्रारीमध्ये श्रद्धानं आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार श्रद्धाने यात दिलीय. माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत म्हटलंय आहे. ज्या गोष्टीची भीती होती ती खरी ठरली आणि आफताबने 18 मे 2022 ला श्रद्धाचा गळा दाबून खून केला. या प्रकरणात आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawalla) पोलीस कोठडीत आहे.