नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला मोठा पराभवावर माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही हा पराभव स्विकारला आहे. मात्र, 'देशाच्या गद्दारांना गोळी घाला ...', 'भारत-पाकिस्तान' सामना, अशी विधाने केली गेलीत. या विधानांमुळे पक्षाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीकरांनी एवढ्या जोरात बटन दाबा की शाहीन बागला करंट लागला पाहिजे, असे विधानही अमित शाह यांनी केले होते. पीएफआय-शाहीन बाग लिंकबाबत अमित शाह म्हणालेत, आम्हाला पीएफआय संदर्भातील काही तपास यंत्रणांकडून अहवाल प्राप्त झाला आहे. गृहमंत्रालय याची चौकशी करत आहे. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानुसार आम्ही कारवाई करू.



दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने सलग तीन वेळा विजय मिळवला. तर दोन वेळा ६० पेक्षा जास्त जागा जिंकत मोठे यश संपादन केले. मागिल निवडणुकीत ६७ जागा जिंकल्या होत्या. तर २०२० च्या निवडणुकीत ६२ जागा जिंकल्यात. तर भाजपला ८ जागा मिळाल्यात. त्याआधीच्या निवडणुकीत भाजपला केवल तीन जागा मिळाल्या आहेत. आम आदमी पार्टीने स्थानिक मुद्द्यांवर आणि केलेल्या विकासकामांवर निवडणूक लढवली. तर भाजपने राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणले. त्याचा त्यांना फायदा न होता जास्तच तोटा झाला आहे.


दरम्यान, अमित शाह यांनी सीएए मुद्द्यावर भाष्य केले. मी दिन दिवसांची वेळ देत आहे. ज्याला माझ्याबरोबर नागरिकता संशोधन कायद्याशी संबंधित (सीएए) मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, त्यांनी ती जरुर करावी.